मनोरंजन

Akshay Kumar : शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहायला अजय उत्सुक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अक्षय कुमारने करिअरमधल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. अक्षयने नुकतेच या चित्रपटातील आपला फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या या लूकवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्याच्या या फर्स्ट लूकवर अभिनेता अजय देवगणचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजयने अक्षयचा शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. प्रिय अक्षय कुमार, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटात तुला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ते माझे आवडते मराठा नायक आहेत आणि या महान योद्ध्यांवर आणखी एक चित्रपट बनवला जात असल्याचा मला आनंद आहे', असे त्याने लिहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT