Akshay Kumar Saif Ali Khan work together
मुंबई - अक्षय कुमार आणि सैफ अली खानने 'हैवान' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या जोडीचा चित्रपट मुहूर्ताचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही जोडी तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. १९९४ मध्ये "मैं खिलाडी तू अनाडी" या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी आणि रागेश्वरी यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
आता अक्षय कुमार आणि सैफ अली खान 'हैवान' या चित्रपटातून पुन्हा एकत्र येणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग शनिवारी सुरू झाले असून खुद्द अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्रामवर बीटीएस व्हिडिओ शेअर केले आहेत. क्लिपमध्ये तो सैफ अली खान आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत बातचीत करताना दिसत आहे. दोघे तब्बल १८ वर्षांनंतर एकत्र काम करतील. दोघांनी अखेरीस 'टशन'मध्ये एकत्र काम केलं होतं. जो बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही.
त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "हम सब ही हैं थोडे से शैतान...कोई ऊपर से संत, कोई अंदर से हैवान.''
पुढे म्हटलंय- आज माझ्या आवडते कॅप्टन प्रियदर्शन सरांसोबत हैवानचे शूटिंग सुरू करत आहे. जवळपास १७ वर्षांनंतर सैफसोबत काम करणं खूप चांगलं वाटत आहे. चलो हैवानियत की शुरुआत करते हैं!! @kvn. productions @thespianfilms_ind".
रिपोर्ट्सनुसार, हैवान एक हॉरर थ्रीलर आहे. हा मल्याळम चित्रपट ओप्पमचा रीमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एक किलरच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान एक दृष्टिहीन व्यक्तीच्या भूमिकेत आहे. त्याला कलारिपयाट्टू कला येते.
दरम्यान, प्रियदर्शन आणि अक्षय कुमार 'भूत बांगला' नावाच्या एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. हा एक हॉरर ड्रामा २०२५ च्या अखेरीस रिलीज होण्याची संभावना आहे.