मनोरंजन

खिशात १ रुपया अन्‌ उडण्याचं स्वप्न; अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चा ट्रेलर भेटीला (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'सरफिरा' हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. सुधा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अक्षयने वीर म्हात्रे नावाच्या एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे, जो स्वत: च्या खिशात १ रुपये असताना यशस्वी होण्याची स्वप्न पाहतो आणि ते तो पूर्ण करतो. याच चित्रपटाचा आता धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलरच्या सुरूवात अक्षय कुमार त्याच्या नावापासून म्हणजे, वीर म्हात्रे पासून करतो. यानंतर तो मी कर्जबाजारी झालो आहे. यामुळे माझ्याकडे पैसे टिकत नाहीत. जर चुकून माझ्याकडे पैसे आले तर ते कर्जदाराना देण्यात येते. असे शब्द बोलले आहेत. त्याच्याकडे काहीही नसते मात्र, बिझनेस कशा करायची कल्पना असते. या कल्पनेतून तो पुढे आयुष्य जगतो. मात्र, त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर काही कमी होत नाही.

परवेझ गोस्वामी याच्यासोबत त्याला काम करायचे असते. मात्र, ते काहीही करता येत नाही. दुसरीकडे अक्षयची आई आणि गावतले लोक त्याच्या उत्तुंग कामगिरीची वाट पाहत असतात. अथक प्रयत्नानंतर शेवटी अक्षयला या सगळ्यातून यश मिळते. हा त्याचा प्रवास सोपा नव्हता, मात्र, त्याने तो प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलाय, असे दाखविले आहे. या प्रवासात अक्षयला बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदनने साथ दिली.

हा चित्रपट साऊथ स्टार सूर्याच्या तामिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू' चा हिंदी रिमेक आहे. ज्याचे दिग्दर्शन सुधा यांनी केलं आहे. यामुळे चाहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT