Actress Akanksha Chamola | आकांक्षा म्‍हणते... ‘लग्नापूर्वी मी बायसेक्शुअल होते...’ 
मनोरंजन

Actress Akanksha Chamola | आकांक्षा म्‍हणते... ‘लग्नापूर्वी मी बायसेक्शुअल होते...’

पुढारी वृत्तसेवा

अनुपमा' फेम गौरव खन्नाची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या 'लॉक अप सीजन २' या रिॲलिटी शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच तिने या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने गौरव खन्नासोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले होते, तर आता तिने स्वतःच्या लैंगिक ओळखीबाबत मोठा खुलासा केला आहे.

शोमधील स्पर्धक श्रेया कालराने आकांक्षाच्या 'बायसेक्शुअल' असण्याबाबत चर्चा केली होती. हा व्हिडीओ होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख यांनी आकांक्षाला दाखवला, तेव्हा ती भावुक झाली. त्यानंतर आकांक्षाने स्वतः जाहीरपणे कबूल केले की, लग्नापूर्वी ती बायसेक्शुअल होती आणि काही मुलींसोबत तिचे रिलेशनशिपही होते. आकांक्षा म्हणाली की, तिला नेहमीच महिलांसोबत सुरक्षित वाटायचे. लोक याला 'बायसेक्शुअल' म्हणत असले, तरी ती याकडे फक्त एक भावनिक नाते म्हणून पाहते.

रितेशने आकांक्षाच्या धैर्याचे कौतुक करत म्हणाला, “आपण समाजात राहतो, त्यामुळे निकाल दिले जातात, न्यायाधीश असतात, पण तू इथे येऊन हे व्यक्त करत आहेस, त्यामुळे मला तुला अधिक धैर्य द्यायचे आहे. मी फक्त एवढंच म्हणू शकतो.” रितेशचे शब्द ऐकून आकांक्षाला रडू कोसळले, पण मग एका सह-स्पर्धकाने तिला मिठी मारून धीर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT