मनोरंजन

लग्नाचा वाढदिवस : अजय देवगनने शेअर केली हटके पोस्ट

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि काजोल यांची प्रेम कहाणी सर्वश्रुत आहे. आज २४ फेब्रुवारी रोजी दोघांच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांची रिअल लाईफदेखील खूप इंटरेस्टिंग आहे. लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करताना अजयने काजोलला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

अधिक वाचा – श्रीदेवी आणि दिव्‍या भारतीचे कनेक्शन काय? 

अजयने रेड वाईनच्या बाटलीवर स्वत:चा आणि काजोलचा फोटो प्रिंट केला आहे. त्यासोबत लिहिलंय, "सन १९९९ पासून दोघे एकत्र आहोत. हे स्पेशल एडिशन आहे." 

दोघांनी महाराष्ट्रीयन पध्दतीने विवाह केला होता. 

हटके लव्ह स्टोरी 

'हलचल' (१९९५) मध्ये दोघे पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसले होते. एका मुलाखतीत काजोलने अजय देवगनच्‍या (तिचा पती) झालेल्‍या पहिल्‍या भेटीबद्‍दल सांगितले होते. काजोल म्‍हणाली होती, 'मी सुरुवातीला अजयला खडूस आणि विचित्र समजत होते.'  

वाचा- जेव्हा विवाहित माणसाच्या प्रेमात पडल्या होत्या श्रीदेवी

काजोल म्‍हणाली, 'ज्‍यावेळी मी पहिल्‍यांदा अजयला भेटले, त्‍यावेळी तो कॉफी पित होता आणि प्रत्‍येकाकडे पाहत होता. ते खूपच विचित्र वाटत होतं. असं कुठल्‍या तरी व्‍यक्‍तीला पाहणे, माझ्‍यासाठी विचित्र होतं. नंतर आम्‍ही एकमेकांशी बोललो, त्‍यावेळी समजलं की, अजय एक समजूतदार व्यक्ती आहे. तो खूप कमी बोलायचा. पहिल्‍या भेटीत तो मला खूप खडूस वाटला होता. आमच्‍या प्रेमाची सुरूवात मैत्रीने झाली होती.'

काजोल म्हणाली होती की, "माझा माझ्या बॉयफ्रेंडसोबत वाद सुरू होता. आणि याविषयी मी अजयला सर्व सांगायचे. तो समोर एक बाबाजी किंवा गुरुजीसारखे बसायचा. सर्व ऐकून घ्यायचा. आणि मग सल्ला द्यायचा की, मला काय करायला हवे आणि काय नाही आणि त्यावेळी त्या परिस्थितीला मला कसं हँडल करायला हवं?"

 

SCROLL FOR NEXT