Chauhaan Ajay Devgn pudhari
मनोरंजन

Chauhaan Ajay Devgn: पठानों से कहना चौहान आ रहा हैं... अजय देवगणच्या Chauhaan ने दिली वादाला फोडणी, शाहरूख खानला डिवचलं?

Anirudha Sankpal

Chauhaan Ajay Devgn: अजय देवगण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी अजय देवगण आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असून या चित्रपटाचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. यात अजय देवगण काश्मीरमध्ये पोस्टेड असून तो काश्मीरमधील दगडफेकीबाबत मोठ्या अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या टिझरवेळी अजय देवगण हा पाठणों से कहना की चौहान आ रहा हैं... असा डायलॉग मारतो.

टीझरने वादाला फोडणी?

डायलॉग जरी साधा सरळ वाटला तरी या डायलॉगचे अनेक कंगोरे आहेत. शाहरूख खानच्या पाठण या चित्रपटाला हा काऊंटर म्हणून तर चित्रपट काढलेला नाही ना अशी शंका देखील अनेक चाहत्यांच्या मनात आली आहे. तसेच याचा धार्मिक अँगल देखील लक्षात घेतला तर येत्या काळात या टीझरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता दाट आहे.

चौहानमध्ये काय करतोय अजय?

दिग्दर्शक नीरज यादव यांच्या चौहान या चित्रपटात अजय देवगण एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असून तो काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्या तरूणांवर कारवाईच्या मोडमध्ये दिसत आहे. तो ७५ वर्षाच्या काश्मीरच्या खराब परिस्थितीमुळे भारतीय लष्करी जवानांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याचा पाढा वाचताना दिसत आहे.

चौहान हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असल्याचं त्याच्या टीझरवरूनच जाणवत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये भौकाल निर्माण करेल असा त्याचा टीझर आहे. सेनेच्या वर्दीत अन् तोंडावर खास डेविल मास्क घातलेला अजय देवगण एकदम डॅशिंग दिसत आहे.

जिओ स्टुडिओजच्या उरी आणि धुरंदर या चित्रपटांना चाहत्यांना उदंड प्रतिसाद दिला होता. आता हाच जिओ स्टुडिओ हा चौहान चित्रपट प्रोड्युस केला आहे. प्रोड्युसरमध्ये आनंद राय आणि ज्योती देशपांडे यांचे देखील नाव आहे. या दोघांनी धुरंदर देखील प्रोड्युस केला आहे.

अजय देवगण चौहानमध्ये जवळपास २० वर्षानंतर लष्करी गणवेशात आणि आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असणार आहे. यापूर्वी तो टँग चार्ली या चित्रपटात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो सिंघममध्ये पोलिसांच्या भूमिकते होता. तर भूजमध्ये एअरफोर्स ऑफिसर होता. मात्र अजय देवगण पडद्यावर आर्मीचा युनिफॉर्म २० वर्षानंतर पुन्हा घालणार आहे. चौहानची रिलीज डेट १ ऑक्टोबर २०२७ अशी निश्चित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT