दुबईतून परतली ऐश्वर्या राय; ब्लॅक ड्रेसवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा Aishwarya Rai
मनोरंजन

दुबईतून परतली ऐश्वर्या राय; ब्लॅक ड्रेसवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Aishwarya Rai : दुबईतून परतली ऐश्वर्या राय; ब्लॅक ड्रेसवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधान आलं होतं. याच दरम्यान ऐश्वर्याने दुबईतील ग्लोबल व्ह्युमन फोरम या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या नावातून 'बच्चन' हे आडनाव काढुन टाकल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकादा कपलच्या घटस्फोटोच्या चर्चांना उधान आलं होतं. आता ऐश्वर्या दुबईतून भारतात परतली आहे. मात्र, तिच्या विमान तळावरील लुकवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय दुबईतील कार्यक्रमानंतर मुंबईच्या विमान तळावर स्पॉट झाली. दुबईत ब्ल्यू ड्रेसमध्ये दिसणारी अभिनेत्री यावेळी ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. यावेळी तिने ओव्हरसाईज फुल स्लीव्ज चकचकीत जॅकेट परिधान केलं होते. ब्लॅक टॉप आणि मॅचिंग स्क्रिन- फिट टाईट बॉटम परिधान केली होती.

यासोबत तिने ग्लोईंग मेकअप करत स्मोकी आयलायनर, पिंक रंगाची लिपस्टिक तिने लावली होती. तिने हातात घड्याळ, स्नीकर्स, अंगठी आणि ब्लॅक सॅक, मोकळे केस या वेशभूषेत ती दिसली. मात्र, हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. हा व्हिडिओ मानव मगलानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. यात एका युजर्सने 'केसांची स्टाईल बदला' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने हेअर स्टाईल ते ड्रेसिंग सेन्स आवडला नसल्याचे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने ऐश्वर्याला 'ड्रेसिंग सेन्स चांगला नाही, मात्र, मेकअप खूपच केलाय' असे म्हटलं आहे. यासोबतच दुबईतील कार्यक्रमात तिच्या नावा पुढील 'बच्चन' हे आडनाव काढुन टाकल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे कपलच्या घटस्फोटोबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

( manav.manglani instagram वरून साभार )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT