Aishwarya rai Instagram
मनोरंजन

Aishwarya Rai | ऐश्वर्याने बालकृष्णकडून घेतला आशीर्वाद

पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या आयफा पुरस्कार वितरण सोहळ्यात चियान विक्रम, नानी आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नावाची चर्चा झाली. 'दसरा' या तेलुगू चित्रपटासाठी नानीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर तमिळ चित्रपट 'पोनियान सेल्वन २' या सिनेमाच्या चियान विक्रमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ऐश्वर्या राय बच्चन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अबुधाबीच्या बेटावर झालेल्या या सोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण हा ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देताना दिसत आहे. व्हिडीओत बघायला मिळते की, नंदामुरी बालकृष्ण स्टेजवर आले आणि ऐश्वर्याला पुरस्कार देण्यास सुरुवात करताच तिने ट्रॉफी घेण्यापूर्वी त्यांच्या पायांना स्पर्श केला.

नंदामुरी बालकृष्ण यांनी तिला प्रथम आशीर्वाद दिला. स्टेजवर ती दुसऱ्यांदा कोणाच्या पाया पडताना दिसली नाही. ऐश्वर्या यापूर्वी मणिरत्नम यांच्या पाया पडली होती. ऐश्वर्या आयफा उत्सव २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन कॅटेगरीत सादरकर्ता बनली. त्यांनी मणिरत्नम यांना 'पोनियान सेल्वन २' या सिनेमातील कामासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला. यावेळी ऐश्वर्या खूप उत्साही दिसत होती आणि जेव्हा ते स्टेजवर आले तेव्हा तिने त्यांच्या पायाला स्पर्श केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT