मनोरंजन

अहिल्या ‘पारु’ सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पारू' मध्ये सध्या खूप काही घडताना दिसत आहेत. एकीकडे गुरुजींनी अहिल्याला एक कठीण व्रत करायला सांगितलं आहे. अहिल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कठीण पद्धतीने उपवास करून व्रत करते. तर दुसरीकडे आदित्य एका डोळ्यांच्या प्रेमात पडतो, ते डोळे पारुचे आहेत, याची त्याला कल्पना नाहीये. पारु अहिल्यादेवीची ओटी भरते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. दामिनीचे कट कारस्थाने चालूच आहेत. यावेळी तिचा डोळा वैजूवर आहे.

दामिनीने वैजूला गायब केले आहे. वैजूला राहायला जागा नसल्यामुळे पारू टेन्शन मध्ये आहे. इकडे आदित्यला कळतं वैजू गायब झाली आहे आणि दामिनीने वैजूला विकले आहे. आदित्य जाऊन वैजूला सोडवूं आणतो. पण आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की, वैजूची राहायची व्यवस्था कुठे करू शकतो. यासाठी आदित्य अहिल्याकडे वैजुला घरात ठेवायची परवानगी मागायला जातो. पण अहिल्यादेवी वैजूला घरात ठेवायची परवानगी देतील?

हे सगळं जाणून 'पारू' दररोज संध्या. ७:३० वा. फक्त झी मराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT