मनोरंजन

Age Difference : ‘या’ स्टार्सनी मोठ्या वयाच्या पार्टनरसोबत केले लग्न

स्वालिया न. शिकलगार

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क

(Age Difference) – प्रेमाची कोणती सीमा असते ना वय. त्‍यामुळेच आपले प्रेम मिळवण्‍यासाठी इतर कुणाचाही विचार केला जात नाही. कोण काय म्‍हणेल, याची पर्वा त्‍यांना नसते. मग, ती व्‍यक्‍ती वयाने मोठी असो वा लहान. प्रेमामध्‍ये त्‍यांचे वय कधीच आड येत नाही. (Age Difference )

बॉलिवूडमध्‍ये अशा अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत, ज्‍यांना 'बडे अच्छे लगते हैं'. आपल्‍यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्‍या किंवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी त्‍यांनी विवाह केला आहे. प्रेमात लोक वेडे होतात. लग्‍न करण्‍यासाठी येथे कोणतेही स्‍टेटस पाहिले जात नाही, पैसे पाहिले जात नाही, धर्म, जात-पात पाहिली जात नाही. येथे केवळ प्रेम पाहिलं जातं. वय लहान असो वा मोठे येथे त्‍याला अजिबात महत्त्‍व दिलं जात नाही. अनेक स्टार्स आपल्‍या वयापेक्षा मोठं अथवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी लग्न केल्याचं आपण पाहतो. यावेळी असं म्हणावसं वाटतं…वयाचं काय घेऊन बसलाय? इथे तर थेट लग्न करून मोकळे झालेत.

कॅटरीना कैफ-विकी कौशल

कॅटरीना कैफ-विकी कौशल

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांचं लग्न ९ डिसेंबरला होतंय. तुम्हाला माहितीये का, विकी कौशल कॅटरीना कैफपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे.

तरी बरं सल्‍लू भाईने आपल्‍या लग्‍नाचा विषय ड्रॉप केला आहे. जर सलमान आणि कॅटरीनाचं प्रेम पक्‍क झालं असतं तर येथे १९ वर्षांचं अंतर पाहायला मिळालं असतं.

अर्जुन कपूर आणि मलायका

अर्जुन कपूर आणि मलायका

सध्या चर्चेत असलेली हॉट जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका. दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा मध्‍यंतरी सुरू होती. अर्जुन कपूर ३३ वर्षांचा आहे तर मलायका ४५ वर्षांची. अर्थात मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. मलायकाने अरबाज खानशी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर अर्जुन आणि मलायकाची जवळीक वाढली. दोघे अनेकदा एकत्र स्‍पॉट झाले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जोधपूरमध्‍ये लग्‍नबंधनात अडकले. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २६ वर्षे. म्‍हणजेच दोघांच्‍या वयात १० वर्षांचे अंतर आहे. दोघांची भेट पहिल्‍यांदा मेट गाला २०१७ च्‍या इव्‍हेंटमध्‍ये झाली होती.

मिलिंद सोमन आणि अंकिता

मिलिंद सोमन आणि अंकिता

प्रेम आंधळं असतं, असं म्‍हटलं जातं. प्रेमाच्‍या आड कोणतीच गोष्‍ट येत नाही. मॉडेल मिलिंद सोमणचेदेखील तसेच झाले आहे. त्‍याच्‍यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने विवाह केला. मिलिंद सोमणचे वय ५२ तर अंकिता २४ वर्षांची आहे.

मिलिंदची दुसरी पत्नी अर्थात अंकिता ही आसामची असून तिचे खरे नाव सुनकुस्मीता कोणवार असे आहे. मिलिंद सोमनने अंकिताशी २२ एप्रेल २०१८ ला महाराष्‍ट्रीयन पद्‍धतीने लग्‍न केले होते. मिलिंद सोमन आणि अंकिता यांच्‍या वयात २५ वर्षाचे अंतर आहे. अंकिता मिलिंदपेक्षा लहान आहे. या कारणावरुन या जोडीला ट्रोल करण्‍यात आले होते. याआधी मिलिंद सोमनने २००६ मध्‍ये फ्रान्‍समधील अभिनेत्री मिलिन जैम्पेनोई हिच्‍याबरोबर लग्‍न केले होते. त्‍यांचे हे लग्‍न फार काळ टिकू शकले नाही. तीन वर्षांतच ते वेगळे झाले.

शाहिद कपूर-मीरा राजपूत

शाहिद कपूर-मीरा राजपूत

शाहिद आणि मीराचे लग्‍न २०१५ मध्‍ये झाले होते. आणि त्‍यावेळी मीरा २१ वर्षांची होती तर शाहिद ३४ वर्षांचा. दोघांच्‍यामध्‍ये १३ वर्षांचे अंतर आहे. मीरा राजपूतने आपल्‍या इ्‍स्‍टाग्राम चॅटमध्‍ये फॅन्‍सनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना म्‍हटले होते, मी लग्‍नापूर्वी काही वर्षे आधी शाहिदला भेटले होते. त्‍यावेळी माझे वय ६ होते. एक फॅन म्‍हणून मी त्‍याला भेटले होते.

सैफ अली खान-करीना कपूर

सैफ अली खान-करीना कपूर

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी मोठ्‍या पडद्‍यावर सुपरहिट राहिली. रिअल लाईफमध्‍येही या दोघांची जोडी हिट आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीना कपूर सैफ अली खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. सैफ करीनावर इतके प्रेम करत होता की, त्‍याने आपल्‍या हातावर करीनाचे नाव गोंदवले आहे. विशेष म्‍हणजे, सैफ विवाहित होता, त्‍याला दोन मुले आहेत. हे माहिती असतानाही करीना सैफशी विवाहबध्‍द झाली.

सैफचा विवाह अभिनेत्री अमृता सिंहशी झाला होता. त्यांच्याही वयात खूपच अंतर होते. हे अंतर तब्बल १२ वर्षांचे होते. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी माेठी होती. म्हणजे सैफच्या दोन बायकांच्यामध्ये तब्बल २४ वर्षांचे अंतर आहे हा एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत. broken heartअमृतापासून वेगळे झाल्‍यानंतर सैफने करीनाशी विवाह केला. सैफ-करीनाला दाेन मुले आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया

रितेश देशमुख आणि जेनेलिया

रितेश देशमुख आणि जेनेलियाची केमिस्‍ट्री मोठ्‍या पडद्‍याबरोबरच रिअल लाईफमध्‍येही जुळली. तुझे मेरी कसम या चित्रपटात दोघे एकत्र आले ते कायमचेच. खर्‍या आयुष्‍यातही ते दोघे फेब्रुवारी २०१२ मध्‍ये एकमेकांचे झाले. रितेश जेनेलियापेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे.

संजय दत्त-मान्‍यता दत्त

संजय दत्त-मान्‍यता दत्त

मुन्ना भाई अर्थातच संजय दत्तने मान्यता दत्त याच्‍याशी तिसरा विवाह केला होता. मान्‍यता संजयला लग्‍नाआधी ९ वर्षांपासून ओळखत होती. संजय दत्तचे अनेक अफेअर्सही होते. संजय मान्‍यतापेक्षा १९ वर्षांनी मोठा आहे. तरीही मान्‍यताने संजय दत्तशी २००८ मध्ये विवाह केला हाेता.(Age Difference)

संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचे कॅन्सरने १९९६ मध्ये निधन झाले. यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्याशी लग्न केले होते. पंरतु, संजय दत्त आणि त्याचे संबंध बिघडल्याने २००८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय यांनी मान्यतासोबत विवाह केला.

आमिर खान आणि किरण राव

आमिर खान आणि किरण राव

आमिर खान आणि किरण राव ही चर्चित जोडी आहे. आता दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. पण, लग्नावेळी आमिर किरण रावपेक्षा ९ वर्षांनी मोठा होता. आमिर खानने एक अभिनेता म्‍हणून नाव कमावले तर आमिर-किरण आपल्‍या विविध सामाजिक कामांमुळे चर्चेत राहिले आहेत.

आमिरने किरण रावसाठी आपले पहिले प्रेम सोडले होते. 'लगान' चित्रपटाने आमिरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्‍ही बदलली. लगान चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी आमिर आणि किरणची पहिली भेट झाली होती. heart या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. किरणलाही आमिर आवडायचा. लगानच्‍या सेटवर आमिरने किरणकडे तिच्‍या कानातील बाली (ईअररिंग्‍ज) मागितली होती आणि तेथूनच दोघांची लव्‍हस्टोरी सुरू झाली होती. २००५ मध्‍ये आमिरने किरणशी विवाह केला. आमिरने २००२ मध्‍ये आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्‍फोट घेतला होता. घटस्‍फोटानंतर आमिरला रिनाला जवळपास ५० कोटी रुपये द्‍यावे लागले होते.(Age Difference)

आमिर आणि रीना दत्ताचे लव्‍ह मॅरेज होते. त्‍यांनी आपल्‍या आई-वडिलांच्‍या मर्जीविरुध्‍द जाऊन लग्न केले होते. अनेक दिवस त्‍यांनी आपले लग्‍न लपवून ठेवले होते. आमिर-रीना दत्ताचे लग्‍न झाले, त्‍यावेळी रीना विद्‍यार्थिनी होती. आमिर त्‍यावेळी 'कयामत से कयामत तक' चित्रपटाचे शूटिंग करत होता. अमीर आणि किरण राव यांचा आता घटस्फोट घेतलाय.

फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान शिरीषपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. त्‍यांना तीन मुले आहेत. ९ डिसेंबर, २००४ रोजी दोघे लग्नगाठीत अडकले. शिरीषचा जन्म २४ मे, १९७३ रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म ९ जानेवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आई-वडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर

श्रीदेवी आणि बोनी कपूर

बोनी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्‍यापेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत. श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला, त्‍यावेळी बोनी कपूर दोन मुलांचे बाप होते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्‍हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. (Age Difference)

बोनी कपूर हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरता अमेरिकेला घेऊन जावे लागले. त्‍यावेळी श्रीदेवी बोनी कपूर यांना आपल्‍यासोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला.

श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी कपूर नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी कपूर यांच्‍याशी जवळीक वाटून प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी कपूरही श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. त्‍यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍याशी दुसरा विवाह केला. त्‍यावेळी बोनी कपूर यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते.

धर्मेंद आणि हेमा मालिनी

धर्मेंद आणि हेमा मालिनी

आणखी एक हिट जोडी म्‍हणजे धर्मेंद आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी. 'शोले'च्‍या सेटवर हेमा यांच्‍याशी धर्मेंद्र यांना प्रेम झालं. मग काय, धमेंद्र आधीपासूनच विवाहित असतानाही हेमा यांनी त्‍यांचं प्रेम स्‍वीकारलं. आपल्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे असणारे धर्मेंद्र यांच्‍याशी हेमा यांनी विवाह केला. धर्मेंद्र हे हेमा यांच्‍यावर इतके प्रेम करत होते की, हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी त्‍यांनी आपला धर्म बदलला होता.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी १९७० मध्‍ये पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर दोघांमध्‍ये जवळीक निर्माण झाल्‍याची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी १९७९ मध्‍ये विवाह केला. ((Age Difference))

धर्मेंद्र यांच्‍या पहिली पत्‍नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. त्‍यांना चार मुले- सनी, बॉबी, अजिता आणि विजिता आहेत. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्‍या दोन मुली ईशा आणि अहाना आहेत.

दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीने एक काळ गाजवला. ही जोडी त्‍यावेळची फेमस जोडी. १९६६ मध्‍ये २२ वर्षांच्या सायरा बानोला दिलीप कुमार आवडायचे. दिलीप यांचे त्यावेळी वय होते ४४ वर्षे. परंतु, प्रेमापोटी आपल्‍या वयापेक्षा दुपटीने असलेल्‍या दिलीप यांच्‍यासोबत विवाह करण्‍याचं धाडस सायरा यांनी केलं होतं. १९८० मध्‍ये त्‍यांच्‍या नात्‍यात काही काळासाठी दुरावा आला होता. परंतु, काही काळानंतर दोघे पुन्‍हा एकत्र आले.

एज-डिफरन्‍स लव्‍ह

एकेकाळी वयात इतके अंतर म्‍हटलं की, भुवया उंचवायच्‍या. आपल्‍यापेक्षा ५-७ वर्षांनी मोठ्‍या असणार्‍या व्‍यक्‍तीबरोबर (Age Difference) लग्‍न करायचे म्‍हणजे, जगातील दहाव्‍या आश्‍चर्याप्रमाणे असायचं. परंतु, अशा प्रकारची नाती तेव्‍हाही बनायची आणि आताही तो सिलसिला कायम आहे. बॉलिवूडमध्‍ये अशा नात्‍यांना नेहमीच मान्‍यता दिली गेली. आता बॉलिवूडमध्‍ये ऐज-डिफरन्‍स लव्‍ह कॉमन गोष्‍ट बनली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT