Misha Agarwal suicide : सोशल मिडियावर स्टार असलेल्या मिशा अगरवालने 25 व्या वाढदिवसाला केवळ दोन दिवस बाकी असताना जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेयर करत तिच्या मृत्यूची माहिती दिली. तिच्या जाण्याने तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला.अगदी अलीकडेपर्यंत सोशल मिडियावर व्हीडियो पोस्ट करणारी मिशा अचानक जगातून नाहीशी झाली यावर तिच्या घरच्यांना आणि मित्र मंडळीला विश्वास ठेवणे कठीण गेले.
मिशाने अचानक एक्जिट घेण्यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच तिच्या मोठ्या बहिणीने शेयर केली आहे. यात तिच्या जाण्यामागची कारणेही बऱ्याच अंशी विषद केली आहेत. मिशाने इतके तडका फडकी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला याचे कोडे तिच्या फॅन्सना या माध्यमातून समजेल या शक्यतेतून मिशाच्या बहिणीने ही पोस्ट शेयर केली आहे.
या पोस्टमध्ये मिशाची बहीण म्हणते, माझ्या बहिणीसाठी इन्स्टाग्रामच तिचे जग होते. तिचे आयुष्य इन्स्टाग्रामभोवतीच फिरत होते. इन्स्टावर 1 मिलियन फॉलोअर्स बनवणे हेच तिचे ध्येय होते. तिला स्वत:चा खास असा चाहतावर्गही बनवायचा होता. पण अचानक तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले. याचा तिला त्रास होऊ लागला. तिच्या डोक्यात सतत फॉलोअर्स वाढवण्याचा विचार सुरू असायचा. फॉलोअर्स कमी झाले तर माझे करियर संपून जाईल. एप्रिलपासून तर जवळपास ती डिप्रेशनमध्ये गेल्यात जमा होती.
मला भेटल्यानंतर ती बरेचदा रडायची. त्यावेळी मी तिला समजावले. इन्स्टाग्राम म्हणजे आयुष्य नव्हे. यात काही नाही तर इतर क्षेत्रात करियर करता येईल. तिनं एलएलबी केलं होतं. त्यात करियर करण्यासाठी मी तिला सुचवले देखील होते. पण तिने स्वत:ला संपवण्याचा मार्ग निवडला. असे तिच्या बहिणीने शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हणले आहे.