मनोरंजन

Siya : सिया चित्रपटाची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मसान, आँखों देखी, न्यूटन या चित्रपटानंतर आता दृष्यम फिल्म्स नवा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसमोर आणत आहे. सिया नावाचा चित्रपट येणार आहे. याविषयीची घोषणा सोशल मीडियावरून करण्यात आली. (Siya) या चित्रपटाद्वारे निर्माता मनीष मुंद्रा दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. सिया ही एका लहान शहरातील मुलीची कथा आहे जी सर्व अडचणींना तोंड देत न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेते आणि दुष्ट पुरुष वर्चस्व व्यवस्थेविरुद्ध चळवळ सुरू करते. या सिनेमॅटिक अनुभवाला जिवंत करण्यासाठी, बॅनरने प्रतिभावान अभिनेत्री पूजा पांडेला मुख्य भूमिकेत निवडले आहे. (Siya)

तिच्यासोबत रंगबाज अभिनेता विनीत कुमार सिंग मुख्य भूमिकेत असेल.

दिग्दर्शक मनीष मुंद्रा सांगतात, "दिवसेंदिवस महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत आहे. सिया हा घोर अमानुषतेचे चित्रण करण्याचा प्रयत्न आहे. जिथे शक्तीहीन, निष्पाप महिलांना अशा जगात ठेवले जाते जेथे त्या महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते."

चित्रपटाची अभिनेत्री पूजा पांडे म्हणते, "एक स्त्री म्हणून मला ही कथा महत्त्वाची वाटली. ही एक कथा आहे जी सांगण्याची गरज आहे, ती असंख्य पीडितांच्या भावनांशी प्रतिध्वनित आहे."

विनीत कुमार सिंग म्हणतो, "दृश्यम फिल्म्सला सियाच्या माध्यमातून हे ध्येय साध्य करण्यावर विश्वास आहे, जो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल याची खात्री आहे."

दृष्यम फिल्म्स निर्मित, मनीष मुंद्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १६ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT