अदनान शेखचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या  Adnaan Shaikh Instagram
मनोरंजन

झोपडपट्टीतून अदनान शेख असा बनला करोडपती यु-ट्यूबर, लग्नामुळे आला चर्चेत

Adnaan Shaikh Story | धारावीच्या झोपडपट्टी आलेला अदनान शेख लग्नामुळे चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - मुंबईतील झोपडपट्टीतून एक सोशल मीडिया सेन्सेशन बनण्यापर्यंतचा अदनान शेखचा प्रवास प्रेरणादायी आहे. तो सध्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटोदेखील व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियाचा वापर करून अनेक लोकांनी कमाई साधन अवलंबले आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर अनेक सामान्य लोक सोशल मीडिया स्टार देखील झाले आहेत. यापैकी एक आहे सोशल मीडिया स्टार अदनान शेख. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर, यु-ट्यूबर, अभिनेता आणि बिग बॉस ओटीटी ३ चा स्पर्धक अदानान शेख सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड आयशा खानशी तो विवाहबद्ध झाला.

अदानान शेख ३० वर्षाचा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे११.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर 705K सब्सक्राईबर्स आहेत. मजेशीर व्हिडिओसाठी तो एळखला जातो. रिपोर्टनुसार, वर्षभरात तो १ कोटींहून अधिक कमाई करतो. एका एपिसोडसाठी प्रति तास १ लाखांहून अधिक पैसे घेतो. कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या अदनान शेखने स्वहिमतीवर प्रचंड यश मिळवले.

अदानान मुंबईतील झोपडपट्टी एरिया धारावीत राहत होता. सुरुवातीला तो टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा. काही वादानंतर त्याचे अकाऊंट बंद करण्यात आले होते. तोपर्यंत देशभरात टिकटॉकवर बंदी आणण्यात आली. मग त्याने इन्स्टाग्राम, यूट्यूबचा प्रवास सुरु केला. हळूहळू अदनान सोशल मीडिया स्टार बनला. आज तो कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

अदनानने आपल्या आयुष्याविषयी बोलताना सांगितलं होतं की, त्याने वयाच्या १८ व्या वर्षांपासूनचं आपल्या पालकांकडून पैसे घेणे बंद केले होते. अदनान यांचे म्हणणे आहे की, आम्ही धारावी सारख्या परिसरात राहत होतो. पण माझ्या आई-वडिलांकडे सर्वकाही होतं. मी त्यांच्या पैशांचा वापर कधी केला नाही. वयाच्या १८ वर्षी मी रमजानवेळी केळी विकणे सुरु केलं होतं. त्यातून मी खूप पैसे कमावले. शिवाय कुर्तेदेखील विकले. त्यातून मला ६० हजार नफा झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT