पुढारी ऑनलाईन : 'आशिकी-2' मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आदित्य रॉय कपूरच्या ( Aditya Roy Kapur ) कारकिर्दीची गाडी नंतर धीम्या गतीनेच चालू लागली. आता बर्याच कालावधीनंतर त्याचा 'ओम : द बॅटल विदिन' हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
'एक लडाई जीतने के लिए उससे कई बार लडना पडता है' असा डायलॉग यामध्ये ऐकायला मिळतो. हा चित्रपट 1 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आदित्य 'अॅक्शन मोड'वर दिसून येतो! कधी तो बाईकवरून अॅक्शन करताना तर कधी आगीशी खेळताना दिसतो. टीझरमध्ये त्याचे 'रक्त रहे न रहे लेकीन राष्ट्र रहना चाहिए' असे दमदार संवादही दिसतात. या चित्रपटात त्याच्यासमवेत संजना संघी असून कपिल वर्माने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
हेही वाचलंत का?