Aditya Dhar-Yami Gautam love story  instagram
मनोरंजन

Valentine's day | No Proposal, No Drama! गुपचूप वाढलं प्रेम, थेट हिमाचलमध्ये लग्न, Aditya Dhar-Yami Gautam ची खास प्रेमकहाणी

Aditya Dhar-Yami Gautam | आदित्य धर-यामी गौतमची अशीही 'लव्ह स्टोरी', प्रपोज करण्याची गरजचं पडली नाही..

स्वालिया न. शिकलगार

आदित्य धर आणि यामी गौतम यांची प्रेमकहाणी ‘Uri’च्या सेटवर सुरू झाली. दोघांनी आपलं नातं खासगी ठेवत एकमेकांना वेळ दिला. विशेष म्हणजे आदित्य यांनी यामीला कधी प्रपोज केलं नाही. परस्पर समजूत आणि विश्वासावर आधारलेलं हे नातं थेट ४ जून २०२१ रोजी हिमाचलमध्ये विवाहबंधनात अडकलं.

बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकहाण्या रंगत असतात; काहींमध्ये मोठ्या प्रपोजल्स, तर काहींमध्ये ड्रामॅटिक ट्विस्ट असतात. मात्र Aditya Dhar आणि Yami Gautam यांची प्रेमकहाणी यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्या नात्यात ना भव्य प्रपोजल होतं, ना सोशल मीडियावर मोठी घोषणा. तरीही त्यांचं प्रेम तितकंच घट्ट आणि प्रामाणिक बनत गेलं. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. या मैत्रीतून विश्वास, समजूत आणि आपुलकी निर्माण झाली

विशेष म्हणजे आदित्य यांनी यामीला कधीही पारंपरिक अर्थाने ‘Will you marry me?’ असा प्रपोज केला नाही. अनेक मुलाखतींमध्ये यामीने सांगितले आहे की, त्यांचं नातं इतकं नैसर्गिकपणे पुढे गेलं की वेगळ्या प्रपोजलची गरजच भासली नाही. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि योग्य वेळी लग्नाचा निर्णय घेतला.

आदित्य धर यांचा शांत, स्थिर आणि कुटुंबकेंद्री स्वभाव यामीला भावला होता. साधे आयुष्य जगण्याची दोघांचीही इच्छा, परस्पर आदर आणि कामाबद्दलची निष्ठा सर्वकाही जुळून आलं होतं. विशेष म्हणजे, दोघांनीही एकमेकांना थेट प्रपोज केलं नव्हतं. रेशीम गाठ जुळण्यामागे या लव्ह बर्डची सुंदर कहाणी...

दोघांनी काही काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतर विवाहाचा निर्णय घेतला. कुटुंबीयांची संमती आणि उपस्थिती यांना त्यांनी प्राधान्य दिले. मोठा, बॉलिवूड-स्टाईल सोहळा न करता पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा ठरवले.

एका मुलाखतीत यामी गौतम म्हणाली- 'बॉयफ्रेंड, रिलेशनशीपमध्ये माझा विश्वास नव्हता. पण आदित्य धरने ते केलं, ज्यामुळे मी प्रेमात पडले. ते एक लेखकही आहेत. ते जसे आहेत, तसे राहिले. 'प्रत्येक दिवशी आमचं प्रेम असतं. ते काम संपवून घरी येतील, पाहतील, हसतील..आणि आमचा दिवस चांगला जातो.'

शूटिंगदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू ते एकमेकांच्या जवळ आले. दोघांची ओळख २०१९ मध्ये Uri: The Surgical Strike या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले होते; यामी गौतमने ‘पल्लवी शर्मा’ ही भूमिका साकारली होती. शूटिंगदरम्यान व्यावसायिक ओळख झाली; त्यानंतर दोघांच्यात मैत्री वाढत गेली.

त्यांचे एक हास्य..सर्वकाही विसरायला लावणारं : यामी

ती म्हणाली की, शूटिंगवेळी एकमेकांच्या मनामध्ये काहीच नव्हतं. पण प्रमोशनवेळी आम्ही एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. खूप सुंदर मैत्री आमच्यात सुरु झाली. हेच प्रेम आहे, असं मला वाटतं. सेटवर हे मला समजलं होतं की, ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत, खूप चांगले व्यक्ती, नम्र, शांत आणि स्वभाव. खूप छोट्या-छोट्या गोष्टीतून मी त्यांना ओळखलं. कधीही त्यांनी इतरांशी वाईट बोलणं, वागणं..राग, त्रागा कधीही पाहिला नाही. ते कठीण परिस्थितही खूप कूल राहायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सर्वकाही विसरायला लावणारं होतं.

'सवयी जुळल्या..मनही जुळंल'

तिने पुढे सांगितलं की, आदित्य यांनीही माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी जाणल्या. त्यांच्या माझ्या सवयी जुळल्या. आम्हाला बाहेर फिरणं फारसं आवडत नाही. ते खूप चांगले जेवण बनवतात. त्यामुळे विकेंडला जेवणाचा कार्यक्रम असतो. तुझा परिवार हा माझा परिवार असे आदित्य म्हणतात. जी गोष्ट करायची आहे, ते परफेक्ट करतात नाही तर ती गोष्ट ते कधीच करत नाहीत.

एकमेकांना कधीच प्रपोज केलं नाही- यामी गौतम

लग्नाच्या आधी माझ्या फॅमिलीनेही आदित्य यांचे मुलाखतीतचे व्हिडिओ पाहिले होते. त्यातूनही व्यक्ती कसा आहे, ते कळलं. त्यांनी मला प्रपोज केलं नाही, पण आमच्यातील नातं बहरत गेलं...प्रेम होत गेलं, असे यामीने सांगितलं होतं.

तिच्याशी लग्न केलं.. मी भाग्यवान : आदित्य धर

आदित्य धर यांनी ही एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सांगितलं होतं की, 'ती धार्मिक आहे, प्रोफेशनल आहे, ती शूटिंगला वेळेवर असायची, पूजा रोज करायची...सर्वकाही परफेक्ट होतं, म्हणून मी खूप भाग्यवान आहे जिच्याशी मी लग्न केलं.'

असं म्हटलं जातं की, त्यांनी जवळपास २ वर्षे आपले नाते पूर्णपणे खासगी ठेवलं होतं. ४ जून २०२१ रोजी हिमाचल प्रदेश (मंडी) जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली होती. यामी गौतमने सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपल्या लग्नाची घोषणा केली होती. लग्न पारंपरिक हिमाचली रीती-रिवाजांनुसार झाले. यामीने आईची साडी परिधान केली होती आणि सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. आज दोघेही आपापल्या करिअरमध्ये बिझी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT