मनोरंजन

OTT ची राणी अदिती राव हैदरीचे अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्युबिलीमध्ये सुमित्रा कुमारीच्या भूमिकेत असणारी नेहमीच चर्चेत राहणारी नव्याने पीरियड ड्रामाची राणी आदिती राव हैदरी यशाच्या शिखरावर आहे. रुपेरी पडद्यावर काही अविस्मरणीय कामगिरी केल्यानंतर, ती सर्व OTT प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहे. अदिती राव हैदरीचे अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत.

सुमित्रा कुमारीचे तिचे पात्र खरोखरच मनोरंजन करणारे होते कारण सुमित्रा आणि अदिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि विविध परिस्थितींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून सारखा आहे. अदितीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत तिच्या अभिनयासाठी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि प्रशंसा होत आहे.

अलीकडेच तिने ताज: डिव्हाइड बाय ब्लड या मालिकेत अनारकलीची भूमिका केली होती. ती सध्या संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीसाठी चित्रीकरण करत आहे आणि विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत 'गांधी टॉक्स' हा मूकपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT