अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची 47 लाखांची फसवणूक 
मनोरंजन

Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची 47 लाखांची फसवणूक

मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्याच्या कन्या आणि मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची फसवणूक झाल्याचा गुन्हा पोलिसांत नोंद झाला आहे. वर्षा उसगावकर व अन्य चौघांना गुंतवणुकीवर आकर्षक परतावा दिला जाईल, असे सांगून एकूण 47 लाख रुपयांना फसविण्यात आले आहे. या प्रकरणी संशयित अविनाश जाधव याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा नोंदवल्याचे राष्ट्रीय वृत्त संस्थेने म्हटले आहे. याप्रकरणी मृणालिनी जांभळे यांनी प्रथम तक्रार दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT