मनोरंजन

अभिनेत्री तब्बसूम उर्फ किरण बाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : "फुल खिले है गुलशन गुलशन" या कार्यक्रमाच्या अँकर आणि विख्यात अभिनेत्री तब्बसूम उर्फ किरण बाला यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. नर्गिस, मंझदार, बडी बहन, छोटी बहन आणि दीदार अशा. डझनावारी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून तबसुम्म यांनी काम केले.

बचपन के दिन "भुला ना देना आज हंसे कल रुला ना देना" या "दीदार"मधील गाण्याने तबस्सुम सर्वांच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहिल्या. नर्गिसच्या बालपणाची तबस्सूम यांनी भूमिका केली होती. तर दिलीप कुमार यांच्या बालपणाची भूमिका तिच्यासोबत याच गाण्यामध्ये परीक्षित सहानी यांनी केली होती.

तरुणपणी देखील तबस्सुम अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका केल्या. तबस्सुम यांच्या आईचे नाव असदारी बेगम असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव अयोध्यानाथ सचदेव. वडिलांनी पत्नीच्या इच्छेवरून तबस्सुम हे तिचे मुस्लिम नाव ठेवले. तर आईने तबस्सुम हिचे हिंदू नाव किरण बाला असे ठेवले. तबस्सुम यांच्या पतीचे नाव विजय गोविल तर दिराचे नाव अरुण गोविल. अरुण गोविल हे "रामायण" या अजरामर दूरदर्शन मालिकेतील राम होत!

SCROLL FOR NEXT