मनोरंजन

sanvikaa : ‘पंचायत ३’ मध्ये सिंपल दिसणारी रिंकी खऱ्या आयुष्यात हॉट 

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : धमाकेदार 'पंचायत ३' ही वेबसीरीज २८ मे २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. ही वेबसीरीज पडद्यावर येताच चाहत्यांनी तिला भरभरून प्रतिसाद दिलाय. सध्या या वेबसीरीजमधील एकापेक्षा एक हिट कलाकारांच्या पात्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान एकिकडे सचिवजी म्हणजे, अभिनेता जितेंद्र कुमार यांच्या भूमिकेचे जोरदार कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे प्रधानजी यांच्या मुलीचं पात्रची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रधानजीची मुलगी म्हणजे, रिंकी दुबे होय. 'पंचायत ३' ही वेबसीरीजमध्ये रिंकी म्हणजे, अभिनेत्री सानविका भारदस्त अभिनय साकारलाय. या वेबसीरीजमध्ये सिंपल दिसणारी सानविका खऱ्या आयुष्यातही खूपच सुंदर आहे. यामुळे जाणून घेवूयात तिच्याविषयी खास गोष्टी….

'पंचायत ३' ही वेबसीरीजमध्ये अभिनेत्री जितेंद्र कुमारसह अभिषेक त्रिपाठी, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मल्लिक, चंदन रॉय, सान्विका, साद बिलग्रामी, विनोद सुर्यवंशी, विशाल यादव, कुसुम शास्त्री, पंकज झा आणि गौरव सिंह या कलाकारांनी भारदस्त अभिनय साकारलाय. अभिनेता चंदन रॉय यांनी या बेवसीरीजमध्ये विकासची भूमिका केली आहे. तर जितेंद्र कुमार यांनी सचिव जीची भूमिका साकारलीय. तर प्रधानजींची भूमिका अभिनेता रघुबीर यादव यांनी साकारली. मात्र, प्रधानजी मुलगी रिंकीची खूपच चर्चा झाली. रिंकीची भूमिका अभिनेत्री सानविका उत्तमरित्या निभावली आहे.

रिंकीचं खरं नाव…

रिकी दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव सानविका आहे. आधीच्या 'पंचायत' या वेबसीरीजमध्ये सानविकाचं पूजा सिंह असे नाव होतं. दुसऱ्या सीझनमध्ये ते बदलून सानविका असे ठेवण्यात आलं. तिच्या नावारून यावेळी बराच गोंधळ झाला होता.

खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस

'पंचायत ३' या वेबसीरीजशिवाय सानविका रियल लाईफमध्येही खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक हॉट फोटोज पाहायला मिळतात. नुकतेच तिने व्हाईट- गुलाबी कलरच्या मिनी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "Ap sab ke pyar ke liye bhaut bhaut shukriya 🥰". असे लिहिले आहे.

हे फोटोज तिचे सोशल मीडियावपर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिचे कौतुक करताना भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. दरम्यान एका युजर्सने "रिंकी सचिवजीला एसबीए नापास करणार का?" असे म्हटलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलं आहेत. या फोटोंना आतापर्यत १ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. सानविका हॉट फोटोज शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT