Nia Sharma : केसांत फुलं-व्हाईट साडी; ९० च्या दशकातील नियाच्या मनमोहक अदा  Nia Sharma
मनोरंजन

Nia Sharma : केसांत गुलाब-व्हाईट साडी; ९० च्या दशकातील नियाच्या मनमोहक अदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा 'सुहागन चुडैल' आणि 'लाफ्टर शेफ' या शोमुळे चर्चेत आली आहे. याशोमधील तिच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता नियाचा 'लाफ्टर शेफ' शोच्या सेटबाहेरचा एक जोरदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील तिच्या ९० च्या दशकातील लूकनं चाहत्याच्या नजरा खिळल्या आहेत.

या व्हिडिओत अभिनेत्री 'लाफ्टर शेफ' शोच्या सेटच्या बाहेर व्हाईट रंगाच्या साडीत फिरताना दिसत आहे. या साडीवर तिने डिझाईन असलेल्या ब्लॅक रंगाचे ब्लॉऊज परिधान केलंय. याशिवाय साडीच्या काठालाही ब्लॅक रंगाची बॉर्डर असल्याने तिच्यावर ही साडी खुलून दिसतेय.

केसांची वेणी आणि त्यावर पांढरी फुले, कपाळावर टिकली, हातात बांगड्या, कानात इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. नियाच्या चेहऱ्यावर हसूनं तर चारचाँद लावले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'Pyar hua ikrar hua hai feat Nia sharma, Recreating legendary look of Nargis ji ❤️'.असे लिहिलंय आहे. नियाचा हा ९० च्या दशकातील साधा लूक चाहत्यांना पंसतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल झाला आहे. याला क्षणार्धात म्हणजे, दोन तासांत २६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. दरम्यान एका युजर्सने लिहिले आहे की, 'आज छान दिसत आहेस.' दुसऱ्याने, 'खूप सुंदर दिसत आहे.' तर तिसऱ्या एका युजर्सने लिहिलं आहे की, 'ती वेस्टर्न लूकपेक्षा देसी लूकमध्ये सुंदर दिसते'. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT