Actress Mrunal Thakur | मृणालने ‘या’ व्यक्तीसाठी रद्द केले सर्व कार्यक्रम 
मनोरंजन

Actress Mrunal Thakur | मृणालने ‘या’ व्यक्तीसाठी रद्द केले सर्व कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने एका व्यक्तीसाठी सर्व कार्यक्रम रद्द केले, असे म्हटले तर अनेकांच्या समोर सध्या अभिनेता धनुषचे नाव येईल; पण थांबा. तिचे नाव धनुषसोबत जोडले जात असले, तरी ती व्यक्ती धनुष नाही. मृणालने ज्येष्ठ गायिका गायिका उषा उथुप यांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. काला घोडा आर्टस् फेस्टिव्हलमध्ये उषा उथुप यांचा लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मृणाल फक्त 15 मिनिटांसाठी उपस्थित राहणार होती; मात्र उषा उथुप स्टेजवर येणार असल्याचे कळताच तिने पूर्ण कार्यक्रम पाहण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत मृणाल म्हणाली, ‘उषा मॅडम अप्रतिम आहेत. काही महिन्यांपूर्वी मला त्यांच्यासोबत साडीच्या जाहिरातीसाठी काम करण्याची संधी मिळाली होती. त्या सेटवरून मी खूप काही शिकले. शूटिंगदरम्यान उषा उथुप यांनी तिच्यासाठी मायली सायरसचे ‘फ्लॉवर्स’ हे गाणे खास गाऊन समर्पित केले होते.

लाईव्ह परफॉर्मन्सचा अनुभव सांगताना मृणाल म्हणाली, ‘त्या स्टेजवर असताना आपण तिथे उपस्थित राहायलाच हवे. आजचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. मी फक्त थोडा वेळ थांबणार होते; पण संपूर्ण शो पाहिला. उषा उत्थुप यांच्या ऊर्जेने आणि आनंदी व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते, असेही तिने नमूद केले. दरम्यान, मृणाल सध्या तिचा आगामी चित्रपट ‘दो दिवाने सेहर मे’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक रवी उदयावर यांच्या या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT