मुंबई : पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी इन्स्टाग्रामद्वारे तिने ही माहिती दिली. पूर्ण खबरदारी घेऊनही अखेर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या मी गृह विलगीकरणात असून, लवकरच मी यावर मात करेन, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मास्क वापरा, नियमांचे पालन करा, असे आवाहनही तिने चाहत्यांना केले.