पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या कारचा अपघात झाल्याचे बातमी समोर आले आहे. बुधवारी 26 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईत हा अपघात झाला. यात बसने ऐश्वर्याच्या कारला मागून धडक दिली.
तथापि, हा छोटा अपघात होता आणि अपघातावेळी ती कारमध्ये नव्हती. त्यामुळे ऐश्वर्या सुखरूप आहे. तसेच या अपघातात तिच्या कारचेदेखील नुकसान झालेले नाही.
ऐश्वर्याच्या कारला मागून लाल रंगाच्या बसने धडक दिली होती. मात्र, ऐश्वर्याला यात कोणतीही दुखापत झालेली नाही आणि ती पूर्णतः सुरक्षित आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसेच, हा किरकोळ अपघात असल्याचेही स्पष्ट केले आहे.
एका पॅपराझीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अपघाताबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात दिसतेकी, ऐश्वर्याच्या कारला मागून एका बसने धडक दिली. त्यानंतर तिच्या सुरक्षा पथकातील बॉडीगार्ड्सनी त्वरीत कारमधून उतरून पाहणी केली.
तथापि, कारवर या अपघातात ओरखडाही उमटलेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर बस ड्रायव्हरशी संवाद साधून ऐश्वर्याची कार आणि बस दोन्हीही मार्गस्थ झाले.
या घटनेचा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर ऐश्वर्याचे चाहते चिंतेत पडले. विविध माध्यमांतून अनेकांनी ऐश्वर्याच्या प्रकृतीची विचारपूस सुरू केली. दरम्यान, ऐश्वर्याच्या कारची कोणतीही मोठी हानी झालेली नाही. हा अपघात मोठा नव्हता. पण, ऐश्वर्या सेलिब्रिटी असल्याने प्रसारमाध्यमांतून ही घटना व्हायरल झाली.
दरम्यान, अलीकडच्या काळात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा पुत्र कोणार्कच्या लग्नात ऐश्वर्या दिसून आली होती. कोणार्कने त्याची गर्लफ्रेंड नियतीसोबत विवाह केला असून, या समारंभात संपूर्ण बच्चन परिवार सहभागी झाला होता.
या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या ऐश्वर्या प्रामुख्याने इव्हेंट्स आणि फॅशन शोमध्ये दिसते. ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते आणि सहसा वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरी संबंधी पोस्ट शेअर करते. ऐश्वर्यासह तिची कन्या आराध्या बच्चनही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.