अभिनेता सुयश टिळकचा अपघात
व्लॉग करत दिली माहिती
दुसऱ्या एका पोस्टमधून माध्यमांना अपघताबाबत अतिरंजित बातमी न करण्याचे केले अपील
Suyash Tilak: मालिका, नाटक यातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेला अभिनेता सुयश टिळक याच्या सोशल मीडिया पोस्टने अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याने आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमधून माध्यमांना एक अपील केले आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘ सर्व माध्यमांना विनंती आहे की जी घटना प्रत्यक्ष घडली आहे त्याबाबत बातम्या करा. उगीच शब्दांचे खेळ करून हेडलाईन बनवण्याचा प्रयत्न करू नका. (Latest Entertainment News)
सोशल मीडिया पोस्टवरुन बातमी बनवण्याआधी ती पडताळून पाहण्यासाठी कॉल करून तिची खात्री करावी आणि मगच बातमी द्यावी. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही आणि सोशल मिडियावरील वैयक्तिक पोस्टचा उपयोग बातम्यांसाठी केला जातो. ज्यांनी काळजीने फोन मेसेज केले त्यांना खूप प्रेम. अपघात काही मोठा झाला नाही बातम्या उगाचच तश्या करू नयेत ही विनंती. सुयशच्या या पोस्टवर नेटीझन्स सहमती दर्शवत आहेत.
सुयशचा गाडीचा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात सुयशला दुखापत झाली नाही. यावेळी त्याने एक व्लॉग बनवला होता. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘गाडी अशा ठिकाणी बंद पडली होती जिथे मदतही मिळाली नसती. यावर एकमेव मार्ग म्हणजे गाडीला टो करून मुंबईपर्यंत घेऊन जाणे हा होता. एक तासाने टो करण्यासाठी मदत मिळाली. टो करणाऱ्या ड्रायव्हरने मला गाडीत बसण्यास सांगितले, “जर गाडीला काही मदत लागली तर.” मदत? ती गाडी तर धड श्वासही घेत नव्हती.’ यानंतरचा प्रवास अनुभव त्याने व्लॉगमध्ये शेयर केला आहे. याच्या शेवटी तो म्हणतो, 'कधीकधी, आयुष्य तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध टो करून पुढे घेऊन जाते. तुम्ही तो प्रवास रागावून काढू शकता... किंवा तुम्ही खिडकी उघडून, श्वास घेऊन आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकता.’ सुयशच्या या व्लॉगवर सुकन्या मोने, शिल्पा तुळसकर आणि उदय टीकेकर या कलाकारांनी काळजी व्यक्त केली आहे.
सुयश सध्या ज्याची त्याची लवस्टोरी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या नाटकात त्याच्यासोबत ‘का रे दुरावा’ फेम सुरुचि आडारकर ही दिसते आहे. सुयश पर्यावरणविषयक चळवळीतही अत्यंत हिरीरीने सहभागी होताना दिसतो.