मुंबई : पुढारी ऑनलाईन
अभिनेता सुमित राघवनने मराठी आडनावांवरून एक महत्त्वाचा मुद्दा सोशल मीडियावर मांडला आहे. सुमितने एक ट्विट केलं आहे. यामध्ये आमीर खानने केलेल्या एका जाहिरातीचा संदर्भ त्याने सांगितला आहे. एका जाहिरातीमध्ये आमिर खान 'शिंदे' आडनावाला 'शिंडे' असं म्हणतो. मराठी आडनावे सरळ असताना त्याचा उच्चार करणे इतकं कठीण आहे का? असं सुमितने म्हटलं आहे.
शिंदे हे आडनाव मराठीत वापरलं जातं. पण, हिंदीमध्ये बोलताना या नावाचा उच्चारदेखील अभिनेत्याला कळाला नाही. केवळ आमिरचं नाही. तर त्या जाहिरातीसाठी काम करणारी एजन्सी, प्रोडक्शन हाऊस, क्लाईंट, स्क्रप्ट रायटर, सहाय्यक, क्रिएटिव्ह मंडळी असतात, त्यापैकी कुणालाच ही बाब समजू नये? असा सवालही सुमितने यामध्ये केला आहे. इतकेच नाही तर सुमित राघवनने अभिनेता सयाजी शिंदेला 'बघ बाबा' म्हणत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.