Shashank Ketakar on double parking issue
अभिनेता शशांक केतकर सोशल मिडियावर अत्यंत अॅक्टिव असतो. अनेकदा तो सामाजिक प्रश्नांवर उघड आणि परखड मतही मांडताना दिसतो. आताही त्याने असाच एक व्हीडियो शेयर केला आहे. ‘ भारतामध्ये माणसाचे जगणं अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमत शून्य आहे.’ अशी सुरुवात करत तो पुढे म्हणतो, दुर्दैवाने माझीच सोसायटी, माझ्या बिल्डिंगच्या समोर कमालीची पार्किंग केली आहे एका माणसाने. युपी पासिंग असलेली ही गाडी अत्यंत विचित्र पद्धतीने पार्किंग केली होती.
विशेष म्हणजे आधीच डबल पार्किंगमध्ये असलेली ही गाडी त्याच्या बाजूची गाडी बाहेर काढताना इतकी बाहेर आणून ठेवली गेली की मूळ रस्ता अगदी थोडा उरला आहे.’ या व्हीडियोत पुढे तो म्हणतो, ‘ या रस्त्यावरून विद्यार्थी जात आहेत. लेन किती occupy केली आहे या गाडीने. आपल्याकडे असे की यासाठी चार माणसांनी आपटून काही होत नाही.... एकतर आमच्या वसंत विहारमध्ये डबल पार्किंग केले जातेच. पण पार्किंग मधील आतली गाडी बाहेर काढताना जे केले जाते ते त्रासदायक आहे.
जेमतेम या जागेतून बाईक पास होते आहे. आपल्याकडे खरंच आयुष्य स्वस्त झाले आहे. BMC पाहा, मला माहिती नाही ही bmc ची डायरेक्ट जबाबदारी असते की नसते, पण असलीच तर ही गाडी फक्त उचलू नका, ही गाडी स्क्रॅप करा...
याशिवाय इन्स्टा स्टोरीमध्येही हा फोटो पोस्ट करत तो म्हणतो,
ठिकाण : वसंत विहार
त्रास : Double Parking
समस्या : घंटा काहीही नाही
उपाय : 4 माणसे मेली की पाहू
अशी उद्विग्न पोस्ट शेयर करत त्याने संताप व्यक्त केला आहे. workfront बाबत बोलायचे झाल्यास शशांक सध्या निबार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.