Actor Rajesh Keshav Critical After Collapse
मुंबई : प्रसिद्ध साऊथ अभिनेता आणि अँकर राजेश केशव एका पब्लिक इवेंट दरम्यान अचानक बेशुद्ध झाले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कार्डियाक अरेस्ट आला आहे आणि अँजियोप्लास्टी नंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि पुढील ७२ तास खूप महत्त्वाचे असतील.
एका सार्वजनिक कार्यक्रमात ते अचानक स्टेजवर बेशुद्ध झाले. उपस्थितांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. डॉक्टर्सनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, त्यांना कार्डियक अरेस्ट आला आहे. राजेश ४७ वर्षांचे असून त्यांची प्रकृती अद्याप नाजूक आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री जेव्हा ते मंचावर लोकांचे मनोरंजन करत होते, तेव्हा अचानक ते स्टेजवर कोसळले.
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रताप जयलक्ष्मी यांनी आपल्या सोशल मीडियावर राजेश यांचा एक फोटो पोस्ट करत माहिती दिलीय. त्यांनी एक खूप इमोशनल पोस्ट लिहित सांगितले की, राजेश आता फक्त मशीन्सच्या आधाराने श्वास घेत आहेत. ज्या व्यक्तीने नेहमी व्यासपीठावर प्रकाश टाकला, आनंद पसरवला, ती व्यक्ती आज निपचित पडलीय.