'आतुरतेने वाट पाहत होतो...'; 'देवरा'साठी ज्यु. एनटीआरने मानले आभार   jr ntr and janhvi kapoor
मनोरंजन

Devara movie :'आतुरतेने वाट पाहत होतो...'; 'देवरा'साठी ज्यु. एनटीआरने मानले आभार

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'देवरा' सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आज ''देवरा'' चित्रपट रिलीज होताच सिनेमागृहांमध्ये चाहत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. दिग्दर्शक आणि निर्माते एसएस राजामौली ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाचा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी गेले होते. ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा ॲक्शन ड्रामा चित्रपट दमदार ओपनिंग करत आहे. याच दरम्यान एनटीआरवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केल्यामुळे त्याने चित्रपटाच्या टिमसह सर्वाचे आभार मानले आहेत.

अखेर तो दिवस आला...

सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने नुकतेच एक्स (x) टविट्रवर पोस्ट शेअर लिहिले आहे की, ''ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस अखेर आला आहे. तुमच्या खूपसाऱ्या मिळालेल्या प्रतिसादांनी भारावून गेलो. एवढ्या आकर्षक नाटक आणि भावनिक अनुभवाने 'देवरा' रिलीज केल्याबद्दल कोरटाला शिवा गरुचे आभार. माझा भाऊ अनिरुद्ध, तुझे संगीत आणि पार्श्वसंगीतामुळे चित्रपट गाजत आहे. माझे निर्माते हरिकृष्ण कोसाराजू गरु आणि सुधाकर मिकिलिनेनी गरु यांनी सर्वात मजबूत आधारस्तंभ असल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.''

सेलिब्रेशन पाहून मला खूपच आनंद झाला...

पुढे त्याने म्हटलं की, ''माझ्या चाहत्यांसाठी, 'देवरा'साठी तुमचे सेलिब्रेशन पाहून मला खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रेमाचा सदैव ऋणी आहे. माझ्याइतकाच तुम्ही त्याचा आनंद घेत आहात याचा मला आनंद आहे. मी वचन देतो की, मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन करत राहीन.''

एनटीआरने सिनेमॅटोग्राफर रत्नवेलु, प्रोडक्शन डिझायनर सबू सिरिल, संपादक श्रीकर प्रसाद आणि इतर तंत्रज्ञांचेही आभार मानले. एकिकडे एनटीआरने सर्वाचे आभार मानले आहे. तर दुसरीकडे चाहते थिएटरबाहेर 'देवरा' साठी आनंद साजरा करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणांहून फोटो आणि व्हिडिओही समोर येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT