Govinda-Salman Khan Reunite after 18 years  file photo
मनोरंजन

Govinda-Salman Khan Reunite | तब्बल १८ वर्षानंतर दोन सुपरस्टार पुन्हा एकत्र; बिग प्रोजेक्ट सलमान-गोविंदाच्या झोळीत!

Govinda-Salman Khan Reunite | तब्बल १८ वर्षानंतर दोन सुपरस्टार पुन्हा एकत्र; सलमान-गोविंदा या सुपरहिट जोडीचा धमाकेदार कमबॅक!

स्वालिया न. शिकलगार

सलमान खान आणि गोविंदा तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार आहेत. २००७ च्या ‘पार्टनर’नंतर ही सुपरहिट जोडी पुन्हा बिग प्रोजेक्टसाठी तयार झाली आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून, चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.

Govinda-Salman Khan Reunite after 18 years

मुंबई - 'पार्टनर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालमारे दोन तगडे अभिनेते १८ वर्षांनंतर पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि गोविंदा जवळजवळ दोन दशकांनंतर पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. त्यांच्या फॅन्सना या दोघांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहणे आनंदाची पर्वणीच असेल.

एका वेबसाईटच्या हवाल्याने ही माहिती समोर आलीय की, सलमान खान आणि गोविंदा एका नवीन चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. हा प्रोजेक्ट सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि सध्या चित्रपटाचे नाव निश्चित केलेले नाही. निर्मात्यांनी चित्रपटाचे टायटल गुलदस्त्यात टाकले आहे. हा एक मोठा मनोरंजनात्मक चित्रपट असेल जो पुन्हा या अभिनेत्यांच्या अभिनयाची जादू दाखवेल."

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान आणि गोविंदा एका बिग बजेट कॉमेडी-ड्रामा प्रोजेक्टसाठी साईन झाले आहेत. हा चित्रपट डेव्हिड धवन किंवा त्यांच्या मुलगा रोहित धवन यांच्या दिग्दर्शनाखाली असू शकतो. निर्मात्यांनी या प्रोजेक्टबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केली नाही, पण प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

या प्रोजेक्टचा विषय कॉमेडी, इमोशन आणि अॅक्शनने भरलेला असेल, असे म्हटले जात आहे. ‘पार्टनर’मधील धमाल डान्स नंबर, मजेशीर संवाद आणि केमिस्ट्री अजूनही लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकत्र आल्यास फॅन्ससाठी सुवर्णसंधी असेल.

सलमान खान - गोविंदा यांची जोडी उत्तम अभिनय आणि कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. मोठ्या पडद्यावरही जोडी प्रेक्षकांना देखील आवडते. सलमान सध्या गलवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तर गोविंदा काही OTT प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. पण, दोघांच्या या नव्या मनोरंजनामुळे हास्यकल्लोळ पुन्हा एकदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT