पुढारी ऑनलाईन डेस्क - साठ आणि सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केलेले देब मुखर्जी यांनी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हैवान (१९७७), बातों बातों में (१९७९), कराटे (१९८३), किंग अंकल (१९९३), आंसू बने अंगारे (१९९३) या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले होते. ते ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील होत.
मागील काही वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार आज सायंकाळी ४ वाजता मुंबईतील विले पार्लेतील पवन हंस स्मशानभूमी येथे केले जाईल.
देब मुखर्जी खूप वर्षांपासून 'नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा पंडाल'चे आयोजन करत आले होते. हा कार्यक्रम मुंबईतील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवापैकी एक आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड दिग्गज सहभागी होत असतात. काजोल, राणी मुखर्जी नेहमी पुजेच्या आयोजनात मदत करायच्या.