पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीत रजनीकांत हे एक फार मोठं नाव आहे. रजनीकांत यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
आता सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट त्याच्या घोषणेपासून सतत चर्चेत आहे. चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या चित्रपटातील रजनीकांत यांचा सह-कलाकार उपेंद्र याने केलेले रजनीकांत यांच्याबद्दलचे वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. उपेंद्र याने स्वतःला एकलव्य तर रजनीकांतला द्रोणाचार्य म्हटले आहे. त्याच्या कुली या आगामी चित्रपटातील रजनीकांतसोबत काम करण्याचे अनुभव त्याने शेअर केले आहेत.
कन्नड स्टार उपेंद्र सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'कुली' चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. अलीकडेच या अभिनेत्याने रजनीकांतसोबत काम करण्याच्या त्याच्या उत्साहाबद्दल आणि अनुभवाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की दिग्दर्शकांनी जेंव्हा त्याला रजनीकांतसोबत काम करण्यासाठी विचारले तेंव्हा मी एकदाही विचार केला नाही आणि लगेच चित्रपट करण्यास होकार दिला.
उपेंद्र सध्या त्याच्या आगामी '४५' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी, एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये, अभिनेता म्हणाला, "जेव्हा मला रजनीकांतसोबत काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी क्षणभरही मागेपुढे पाहिले नाही. लोकेश कनागराज स्वतः आले आणि मला गोष्ट सांगितली. रजनीकांतच्या शेजारी उभे राहणेही माझ्यासाठी पुरेसे होते."रजनी सरांनी मला प्रेरणा दिली.
एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये उपेंद्र रजनीकांतबद्दल आदर व्यक्त करत म्हणाला, "जर मी एकलव्य आहे, तर रजनीकांत माझ्यासाठी द्रोणाचार्य आहे. मी त्यांचा त्या प्रमाणात आदर करतो. त्यांनी सर्वांचे मनोरंजन केले. मला कोणी प्रेरणा दिली असेल तर ते रजनी सर आहेत. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांच्यासोबत कुली चित्रपट करता आला.
'कुली' चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. हा चित्रपट त्याचा धमाकेदार टायटल टीझर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. हा चित्रपट रजनीकांत आणि लोकेश यांचा पहिला चित्रपट असून अॅक्शन मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.