हैदराबाद (तेलंगाणा) - पुष्पा २ चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी आज पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद येथून अटक केलीय. दरम्यान, अल्लू अर्जुनने आपल्या वकिलांमार्फत मागणी केली आहे की, हाययकोर्टात याची तत्काळ सुनावणी व्हावी. आदल्या दिवशी अल्लू अर्जुनने त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, एल रमेश कुमार, एसीपी चिक्कडपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवर दिली आहे.