मनोरंजन

अभिषेकने सुरू केले बाल्कींच्या ‘घुमर’चे शूटिंग

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिषेक बच्चन याने नुकतेच त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला आणि याच दिवशी त्याने त्याच्या नव्या चित्रपटालाही सुरुवात केली. या चित्रपटाचे नाव आहे 'घुमर' आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आर. बाल्की. बाल्की आणि बच्चन ही जोडी खास आहे. एक तर सीनिअर बच्चनचा अलीकडच्या काळात कुणी चांगला उपयोग केला असला; तर तो बाल्कीने केला आहे. 'चिनी कम', 'पा', 'शमिताभ' या चित्रपटांत ते दिसते. शिवाय, बाल्कीचा चित्रपट म्हणजे काही तरी वेगळे पाहायला मिळण्याची खात्री असते. त्यामुळेच बाल्की अभिषेकसोबत काम करत असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT