अभिषेक ऐश्वर्या pudhari
मनोरंजन

घटस्फोटावर शिक्कामोर्तब ? अभिषेकने ऐश्वर्याला बर्थ डे विश देखील नाही केले

Abhi Aish Divorce rumour : बच्चन कुटुंबियातील कुणीही तिला विश केलं नाही

अमृता चौगुले

 सध्या चर्चा आहे ती बॉलीवूडचे सुपर कपल ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची. पर्सनल लाइफबाबत अत्यंत गोपनीयता पाळणाऱ्या अभि – अॅशच्या आयुष्यात सारं काही आलबेल नसल्याची कुणकुण त्यांच्या चाहत्यांना राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्नात लागलीच होती. पण आता यावर काहीसं शिक्कामोर्तब देखील होताना दिसत आहे.

याचं कारण म्हणजे ऐश्वर्याचा वाढदिवस. 1 नोवेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. या दरम्यान बच्चन कुटुंबियातील कुणीही तिला विश केलं नाही. अभिषेक बच्चनने ही तिला कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवलच. अमिताभ यांनी ऐश्वर्याला सोशल मिडियावर विश तर केलं नाही. पण तिला फॅन्सनी दिलेल्या शुभेच्छासाठी आभार मानणारी पोस्ट शेयर केली आहे.

यामध्ये त्यांनी तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनबाबत लिहिलं आहे. अर्थात या पोस्टवर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. तर अमिताभ यांच्या वाढदिवासानिमित अॅशने त्यांचा आराध्या सोबतचा फोटोही पोस्ट केला होता. राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्नात वेगवेगळे पोहोचलेल्या बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यामुळे ते वेगळे होत असल्याच्या चर्चेला उधाण मिळाले. अनेकांनी या घटस्फोटाला श्वेता बच्चन जबाबदार असल्याचे म्हणले तर अभिषेकचे अभिनेत्री निमरत कौरसोबत असलेल्या अफेअरमुळे हे नाते तुटल्याचे बोलले जात आहे.  अर्थात अभिषेक किंवा ऐश्वर्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT