अभिषेक बच्चन हा फक्त बॉलिवूडमधील व्हर्सटाईल अभिनेता नाही, तर दूरदृष्टी असलेला यशस्वी व्यावसायिकदेखील आहे. अभिनयातील संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करताना, त्याने क्रीडा संघांची मालकी, स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे. आज ५ फेब्रुवारी वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया अभिषेक बच्चनचा अभिनय ते उद्योगपतीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.
Abhishek Bachchan networth, buisness, investment info
अभिषेक बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचे पुत्र असले तरी, अभिषेकने स्वतःच्या मेहनतीवर अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्याने विविध शैलीतील भूमिका स्वीकारून स्वतःला व्हर्सटाइल अभिनेता म्हणून सिद्ध केलं.
अभिनय क्षेत्रातील कारकीर्द
पदार्पणानंतर काही वर्षे त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. जे. पी. दत्ता दिग्दर्शित रिफ्यजी (२०००) या चित्रपटातून अभिषेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट फारसा चालला नसला तरी त्याच्या अभिनयाची दखल घेतली गेली. तेरा जादू चल गया, बस इतनासा ख्वाब है, शरारत यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण नंतर अभिषेकच्या करिअरला खरी दिशा मिळाली.
महत्त्वाचे यशस्वी चित्रपट:
युवा, बंटी और बबली, दिल्ली ६, सरकार, कभी अलविदा ना कहना, धूम, धूम २, धूम ३, पा, गुरु, रा-वण, मनमर्जिया, लुडो यासारख्या असंख्य चित्रपटातून तो मल्टीप्लेक्स स्टार म्हणून ओळखला गेला.
डिजिटल यश
अभिषेकने ओटीटीवर Breathe: Into the Shadows, दसवीमध्ये अभिनय करून पुन्हा एकदा हम भी किसी से कम नही दाखवून दिले.
क्रीडा संघांचे मालकी हक्क आणि यशस्वी गुंतवणूक
Jaipur Pink Panthers (प्रो कबड्डी लीग) अभिषेकच्या मालकीचा कबड्डी संघ आहे, ज्याने लीगमध्ये यशही मिळवले आहे. यामध्ये अभिषेकने जितकी गुंतवणूक केली (नेमका आकडा उजेडात नाही) त्याचा १०० पटीने परतावा मिळालेला आहे. संघ PKL मध्ये एक प्रतिष्ठित स्पोर्ट्स ब्रँड म्हणून मानलं जातं. संघाने २ वेळा PKL चॅम्पियनशिप जिंकली आहे.
गुंतवणूक आणि आर्थिक यश
अभिषेक बच्चनने जयपूर पिंक पँथर्स संघात केलेली प्रारंभिक गुंतवणूक त्याच्या म्हणण्यानुसार साध्या बजेटपासून सुरू केली होती. पण आता त्याचे मूल्य १०० पटीने वाढलेले आहे. काही रिपोर्ट्सनुसार, अशी माहिती आहे की, सुरुवातीला अंदाजे २.५ कोटी रुपये गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरु झाला. आता फायदा कोटींच्या पटीत आहे.
अभिषेकने कबड्डी टीम कशी खरेदी केली?
अभिषेकने राज शामानीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या कबड्डी टीमबद्दल काही किस्से सांगितले होते. तो म्हणाला की, ''कबड्डी टीम खरेदी करताना कुठलेही ज्ञान नव्हते. जेव्हा कबड्डी टीम खरेदी करायला जाताना सगळे टोमणे मारत होते की, आता विटी-दांडीचे टीम खरेदी करणार का? टीम कशी निवडायची, कशी खेळवायची, रनिंग कॉस्ट कायआहे, कुठे राहायचं, काय करायचं सर्वच काही अंधारात होतं. पण विश्वास होता की, कबड्डी मनोरंजनात्मक आहे, त्यात गती आहे...''
अभिषेकचा मित्र बंटी वालिया( चित्रपट निर्माता) अभिषेकला म्हणाला की, लाईव्ह कबड्डी मॅच जाऊन पाहुया. मी जुहूमध्ये राहतो. तिथे जवळच एक टुर्नामेंट सुरु होतं. १० हजार लोक चिअर करत होते. तिथं. इतकी गर्दी पाहून म्हणालो, हे आश्चर्यजनक आहे.
Chennaiyin FC (इंडियन सुपर लीग फुटबॉल संघ)
हा संघ त्याने एम. एस. धोनी आणि इतरांच्या सहकाऱ्यांसोबत सहमालकी घेतली आहे. अभिषेक बच्चन आणि धोनी दोघेही संघाचे सहमालक आहेत. त्यांच्या नेतृत्वात हा संघ भारतीय फुटबॉलमध्ये एक ब्रँड म्हणून उभा आहे.
धोनी आणि अभिषेक बच्चन यांसारख्या प्रसिद्ध नावांनी संघात गुंतवणूक करून तो अधिक लोकप्रिय बनवला आहे. अभिषेकने चेन्नईयिन एफसी सोबतच इंडियन सुपर लीग या फुटबॉल संघातही गुंतवणूक केली. लीगचे उत्पन्न वाढून चांगला नफा झाला होता.
AB Corp कंपनी
अभिषेकचा AB Corp या त्याचे वडील, अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शन कंपनीचा भाग आहे. त्याअंतर्गत पा, शमिताभ, 'बुड्ढा... होगा तेरा बाप', 'सरकार ३', घुमर यासारख्या चित्रपट आणले. AB Corp कंपनीमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. चांगल्या टक्केवारीत शेअर्स या फॅमिलीकडे आहेत. ही कंपनी चित्रपट निर्मिती, वितरण, डिजिटल कंटेंट, मल्टीमीडिया प्रोजेक्टवर काम करते.
रिअल इस्टेट (मालमत्ता)
अभिषेकने मुंबई, दुबई यांसारख्या प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. रिपोर्टनुसार, त्याने ३० कोटी रुपये रिअल इस्टेटमध्ये गुंतवले आहेत. आलिशान अपार्टमेंट्स खरेदी-विक्र, जमिनीची खरेदी, कोस्टल लँड, आलिशान अपार्टमेंट्स आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केलेली आहे.
इतक्या कोटींची संपत्ती
अभिषेक बच्चन आणि पत्नी, अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची संयुक्त संपत्ती १ हजार ५६ कोटी रुपयांहून अधिक आहे. यात अभिनय, गुंतवणूक, मालमत्ता आणि इतर व्यवसाय यांचा समावेश आहे. ७ मोठ्या यशस्वी ब्रँड्समधी गुंतवणूक आणि रिअल एस्टेटचा एक मोठा पोर्टफोलियो देखील आहे.
त्याचे वडील अमिताभ बच्चन आणि त्याने मिळून २०२०-२०२४ च्या मध्ये जवळपास २१९-२२० कोटींची संपत्ती खरेदी केली होती. बोरीवलीमध्ये १५.४ कोटींचे अपार्टमेंट देखील खरेदी केले आहे. मुंबई, मुलुंड, अलिबाग, जुहू, अयोध्या अशा ठिकाणीही जमिनी खेरदी केल्या. २०२५ च्या एका रिपोर्टनुसार, अभिषेक - अमिताभ बच्चन यांच्या परिवाराची एकूण संपत्ती १६३० कोटी रुपये आहे.
अभिषेक बच्चनने व्यवसायात जाण्याचा निर्णय का घेतला?
एका बिझनेस समिटमध्ये अभिषेक बच्चनने तो व्यवसायात काय आला? याबद्दल सांसांगितले होते. तो म्हणाला, "माझ्या वडिलांची पिढी कामात खूप बिझी होती कारण ते त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते. मला वाटते की, आज कलाकार चित्रपटांना त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते ते त्यांचे एकमेव साधन बनवू इच्छित नाहीत. मीही तेच प्रयत्न केले आहे. परंतु माझ्यावर घर चालवण्याचा कोणताही दबाव नाही."
इतर गुंतवणूक आणि स्टार्टअप
याशिवाय अभिषेकने 'नागिन' (Naagin Hot Sauce अन्न/फूड स्टार्टअपमध्ये गुंतवणूक), 'वाहदम टी' (Vahdam Teas: भारतीय चहा ब्रँडमध्ये एंजेल गुंतवणूकदार), 'जेप्टो' यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीय. एकंदरीत, अभिषेक बच्चन हा फक्त अभिनय क्षेत्रात नसून तो स्पोर्ट्स ओवनर, गुंतवणूकदार आणि व्यवसायिक आहे.