अभिजीत नक्की काय गेम खेळणार? बिग बॉसमध्ये नवं ट्विस्ट येणार  Instagram
मनोरंजन

BB Marathi - अभिजीतचा नक्की गेमप्लॅन काय? डीपी अन् अंकिताला पडलाय प्रश्न

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारने घरातला खिलाडी कोण? असं अभिजीतला विचारताच त्याने निक्कीचं नाव घेतलं. पण अभिजीतने खरंतर अंकिताचं नाव घ्यायला हवं होतं असं धनंजय पोवारला वाटतं. तर अंकितालाही वाटतंय आपलचं नाणं खोटं. त्यामुळे अभिजीतने घेतलेलं निक्कीचं नाव त्याच्याच ग्रुपमधील सदस्यांना खटकलं आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात डीपी म्हणतोय, "निक्कीचा दरारा... तिला 'खिलाडी' हा टॅगही मिळालाय. त्यानंतर अंकिता म्हणते, "निक्कीनेच अभिजीतला 'खिलाडी' हा टॅग दिलाय. आपलचं नाणं खोटं म्हटल्यावर काय?". त्यावर डीपी म्हणतो,"अभिजीतलाही डोकं हवं... त्याने अंकिताला द्यायला हवं होतं... अंकिता पहिली कॅप्टन झाली आहे".

डीपी पुढे म्हणतो,"अंकिताला खिलाडी म्हणून कोणीही मान्य केलं असतं". यावर पॅडी म्हणतो,"जाऊदेत... तरीही जपायचं आहे त्याला". तर पॅडी म्हणतो,"तुम्हाला अजूनही असचं वाटतं का?". पुढे अंकिता म्हणते,"अभिजीत एक मोठा शो जिंकून आला आहे. त्यामुळे त्याच्या आतमध्ये असुरक्षितता आहे. त्याला इथून काहीतरी जिंकून जायचं आहे. त्याला पुढे यायचं आहे". त्यावर पॅडी म्हणतो,"त्याला इतक्या वर्षांनी ही संधी मिळाली आहे". त्यामुळे आता अभिजीतचा नक्की गेमप्लॅन काय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी' पाहावं लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT