मुंबई : पुढारी ऑनलाईन
'बिग बॉस मराठी' फेम आस्ताद काळे व अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी 'व्हॅलेंटाईन डे'च्या औचित्याने रजिस्टर मॅरेज केलं. काल १४ फेब्रुवारी रोजी पुण्यात अगदी मोजक्या पाहुणे, मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. त्यांचे लग्नातल शाही थाटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून आस्ताद-स्वप्नाली एकमेकांना डेट करत होते. या दोघांचा लग्नातील लूक चर्चेचा विषय ठरला आहे. गडद चॉकलेटी रंगाच्या साडीत स्वप्नालीचं सौंदर्य खुलंलं होतं. तर आस्तादने शेरवानी आणि स्वप्नालीच्या साडीच्या रंगाची शाल परिधान केली होती.
लग्न सोहळ्याला हर्षदा खानविलकर, मेघा धाडे, अभिजीत केळकर, संग्राम सामेल हे कलाकार उपस्थित होते.
बिग बॉस मराठीमध्ये आस्तादने आपल्या प्रेमाविषयी सांगितले होतं. दोघांनी 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. स्वप्नालीने 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतदेखील काम केलं आहे. आता तो 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत काम करतोय.
photos-godzee_photography insta वरून साभार