Aditya Roy Kapur and Shraddha Kapoo will together in Aashiqui 3  Instagram
मनोरंजन

Aashiqui 3 |'क्यों की तुम ही हो..' आशिकी-३ मधून पुन्हा आदित्य रॉय-श्रद्धा कपूर यांचा रोमान्स?

Aditya Roy Kapur-Shraddha Kapoor Aashiqui 3 | मोहित सुरी यांनी आदित्य रॉय-श्रद्धा कपूर यांना पुन्हा एकत्र आणण्याबद्दल खुलासा केला.

स्वालिया न. शिकलगार

Aditya Roy Kapur and Shraddha Kapoor reunite in Aashiqui 3

मुंबई - दिग्दर्शक मोहित सुरी यांनी 'आशिकी ३' मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांना पुन्हा एकत्र आणण्याबद्दल खुलासा केला आहे. श्रद्धा आणि आदित्य यांच्यासोबत त्यांना चित्रपट बनवायला आवडेल, असे त्यांनी सांगितले. ते एका चांगल्या कहाणीची वाट पाहत आहेत. एखाद्या चांगल्या लेखकाकडून चांगली पटकथा मिळण्याची आता अपेक्षा आहे. एका वेबसाईटशी बोलताना त्यांनी आशिकी ३ विषयी बातचीत केली.

काय म्हणाले मोहित सूरी?

जेव्हा आशिकी ३ विषयी मोहित सूरींना विचारण्यात आल. तेव्हा ते म्हणाले, ''मला वाटते की, ही गोष्ट तुम्हाला निर्मात्यांना विचारायला हवी... मोहित हसत म्हणाले, 'मी या मुख्य अभिनेत्यांसोबत चित्रपट बनवू इच्छितो. मला एक चांगली स्क्रिप्ट पाहावी लागेल"आशिकी का बोझ मेरे सर पे गीर रहा है. (आशिकी २ सारखा चित्रपट बनवण्याचे ओझे माझ्या खांद्यावर खूप जास्त आहे)."

मोहित सूरी यांनी 'आशिकी २' दिग्दर्शित केला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला होता. आदित्य रॉय कपूर-श्रद्धा कपूर यांचा चित्रपट २०१३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील गाणे आज देखील एव्हरग्रीन आहेत. दुसरीकडे मोहित सूरी दिग्दर्शित चित्रपट 'सैयारा' चर्चेत आहे. यामध्ये अहान पांडे - अनीत पड्डा यांची जोडी ऑनस्क्रीन दाखवली जाईल.

मोहित सूरी यांनी याआधी 'कलयुग', 'जहर', 'मर्डर २', 'एक विलेन' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

georgina dsilva

आदित्यचे रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत फोटो व्हायरल?

गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य रॉय कपूरचे जॉर्जिना डिसिल्वा सोबत डेटिंगची चर्चा रंगली होती. आदित्यने काही फोटोज शेअर केले होते, त्यामध्ये एका तरुणीचा हात दिसत होता. हातावर व्हाईट कलर नेल पॉलिश दिसत होती, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. कारण लोकांना वाटलं की, तो हात जॉर्जिना डिसिल्वा हिचा आहे. कारण, तिनेही पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तेच नेल पॉलिश दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT