आमिर खानने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली Pudhari
मनोरंजन

आमिर खान संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटला; विराजला धीर देताना भावूक अभिनेता

Aamir Khan visit Santosh Deshmukh Family | आमिर खान संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला; विराजला धीर देताना भावूक झाला अभिनेता

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फौंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित आमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. दरम्यान, आमिर खानने नुकतीच पुण्यात धनंजय देशमुख यांची भेट घेतली. अनेक दिग्गज देशमुख कुटुंबीयांची भेट आहेत. आता आमिर खानने किरण रावसोबत धनंजयदेशमुख यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख उपस्थित होता. या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे.

यावेळी आमिर खानने विराजला आलिंगन देऊन सांत्वन केले. यावेळी चर्चेदरम्यान, संपूर्ण देशमुख कुटुंबीयांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तराळले होते. यावेळी आमिर खानने विराज देशमुखला कडकडून मिठी मारली. त्याला धीर दिला. आमिर देखील भावूक झालेला दिसला. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

video -_amol.taur_04 इन्स्टावरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT