Jo Jita wohi sikandar film controvercy
जो जिता वो ही सिकंदर ही या स्पोर्ट्स जॉनर सिनेमाची कथा ब्रेकिंग अवे या अमेरिकन सिनेमाचा रिमेक होता असे म्हटले जाते. पण दिग्दर्शक मंसूर खान यांच्या मते हा सिनेमा त्यांची स्वत:ची गोष्ट होती. यातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेची गोष्ट बऱ्याच अंशी माझ्या आयुष्यासारखी होती.
यातील आमीरची व्यक्तिरेखा ज्याप्रमाणे जगाशी पंगा घेणाऱ्या मुलासारखी होती. कॉलेज ड्रॉप आऊटनंतर माझेही आयुष्य बऱ्याच अंशी त्याचप्रमाणे होते.
पुढे या सिनेमाचा किस्सा सांगताना ते म्हणतात, सुरुवातीला या सिनेमासोबत काहीच परफेक्ट नव्हते. जो जिता वो ही सिकंदर सिनेमा जवळपास संपल्यात जमा होता. याचे मुख्य कारण होते सिनेमातील कास्टची अत्यंत चुकीची निवड.
याचा फटका मला चांगलाच बसला. कारण कलाकारांची निवड चुकली होती हे लक्षात आले तेव्हा जवळपास 60-70 % सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले होते.
त्यामुळे सुधारित कास्टसह हा सिनेमा पुन्हा रिशूट केला गेला. अर्थात या चुकीची पूर्ण जबाबदारी माझीच होती
यातील काही कलाकार अगदीच अॅनप्रोफेशनल होते. त्यांनी सिनेमाच्या सगळ्या टीमचे जगणे मुश्किल करून ठेवले होते. मी शेवटी सिनेमा सोडण्याच्या निर्णयापरत आलो होतो. मी इतका निराश झालो होतो की रात्र रात्र जागा राहायचो. सिनेमाची अवस्था पाहून माझ्या डोळ्यातून पाणी वाहायचे.
मंसूर त्यामध्ये एक नाव घेतात अभिनेता मिलिंद सोमणचे. ते म्हणतात, 'मिलिंद यांचे वागणे अत्यंत अनप्रोफेशनल होते ज्याचा त्रास मला आणि क्रूला झाला. मला यातून सावरले ते आमीर खानने. अमीर मला म्हणला या लोकांना बाहेर काढा. आपण एक चांगला सिनेमा बनवू. मी त्यावेळी खूप निराश झालो होतो. मिलिंद बाहेर गेले आणि सिनेमात दीपक तिजोरीची एंट्री झाली. खरे तर दीपक आणि मिलिंद यांनी एकाचवेळी स्क्रीन टेस्ट दिली होती. पण उत्तम शरीरयष्टीच्या आधारे मी पहिल्यांदा मिलिंदची निवड केली होती. ज्या लोकांना मी सिनेमातून बाहेर काढलं होते ते परत माझ्याकडे आले होते. तरीही त्यांच्यामुळे सिनेमाचे झालेले नुकसान हे मी विसरू शकत नाही असे यावेळी मंसूर खान म्हणाले.