आमीर खान आणि गौरी  pudhari
मनोरंजन

वर्षभराचे नाते; साठीतल्या आमीर खानची नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्राट कोण आहे ?

आमीर सध्या बेंगळुरू स्थित गौरी स्प्राटला डेट करतो

अमृता चौगुले

Amir khan Gauri Spratt : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान आज त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करतो आहे. सुपरहिट सिनेमे, वैयक्तिक आयुष्य, बॉलीवूडच्या सो कॉल्ड पार्टीपासून लांब राहणारा अभिनेता अशी बरीच बिरुद मिरवणारा आमीर त्याच्या लव्ह लाईफमुळे पुनः चर्चेत आला आहे.

आमीर सध्या बेंगळुरू स्थित गौरी स्प्राटला डेट करतो आहे. नुकतेच त्याने मिडियाशी आपल्या या नव्या नात्याबाबत शेयर केले. यावेळी बोलताना तो म्हणाला मी आणि गौरी एकमेकाना 25 वर्षांपासून ओळखतो. तर गेली एक वर्षाहून अधिककाळ आम्ही नात्यात आहोत. मूळ बेंगलोरची असलेली गौरी सध्या आमीर खानच्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करते आहे. गौरी आयुष्यातील बराच मोठा काळ बेंगळुरूमध्ये घालवला आहे. तिला एक सहा वर्षांचा मुलगा देखील आहे.

साठाव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान आमीरने गौरीला कुटुंबीय, मुले आणि माध्यमांना भेटवले. किरण रावसोबतच्या घटस्फोटानंतर आमीर फातीमा सना शेख हिच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता, दंगल सिनेमानंतर या दोघांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान आमीर आणि फातीमा या दोघांनीही यावर मौन पाळणं पसंत केलं होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT