आमिर खान व गौरी स्प्रॅट यांनी लग्नाच्या डाॅक्यूमेंटवर सह्या केल्या.  
मनोरंजन

Aamir Khan Wedding: आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबेडीत, गौरी स्प्रॅट सोबतच्या नात्‍यावर शिक्कामोर्तब!

गौरी स्प्रॅटबरोबर केले रजिस्टर्ड मॅरेज, दोघांच्या वयात १४ वर्षांचे अंतर

Namdev Gharal

Aamir Khan Wedding: बॉलिवूड परफेक्टनिश आमिर खान आज तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी ४७ वर्षीय गौरी स्प्रॅटबरोबर त्‍याने लग्न केले आहे. या कार्यक्रमाला सर्व कुटुंबिय हजर होते. गेले अनेक दिवस मिडीयामध्ये आमिरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. त्‍याने आज एका खासगी समारांभात झालेल्या लग्नाने पूर्णविराम दिला आहे. मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी एका अत्यंत खाजगी घरगुती सोहळ्यात त्यांनी कायदेशीररित्या लग्न केले.

केले रजिस्टर मॅरेज

आज मुंबई येथे ५ जुलै रोजी लेडी लव्ह गौरी स्प्रॅटबरोबर रजिस्टर लग्न करून नवीन नात्‍याचा शुभारंभ केला आहे. रिपोर्टनुसार या लग्नानंर दोघांच्याही डोळयात आनंदाश्रू तरळले. दोघेही या सोहळयानंतर खूष दिसत होते. या लग्नाला आमिरचा परिवार व जवळचे दोस्त उपस्थित होते. आमिरने मुस्लिम रिवाजाप्रमाणे निकाह न करता मॅरेज ॲक्टनुसार रजिस्टर मॅरेज केले आहे. ५ जुलै दुपारी १२.४५ वाजता दोघांनीही लग्नाच्या कागदपत्रावर सह्या केल्या, गौरीचे वय सध्या ४७ वर्षे आहे.

कोण आहे गौरी स्प्रॅट

गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची असून ती फॅशन, ब्युटी क्षेत्रात कार्यरत आहे. तिने लंडनमधून स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे आणि सध्या ती मुंबईत 'BBlunt' सलून चालवते. सध्या ती 'आमिर खान प्रॉडक्शन्स'च्या कामातही मदत करते.

आमिरचे तिसरे लग्न

पहिले लग्न (रीना दत्ता): आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. त्यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

दुसरे लग्न (किरण राव): त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावशी लग्न केले. त्यांना आझाद हा मुलगा आहे. २०२१ मध्ये दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले, परंतु आजही ते त्यांचे प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपटांसाठी एकत्र काम करतात.

तिसर लग्न (गौरी स्प्रॅट) : आज ५ जुलै २०२६ रोजी आमिर खान गौरी स्प्रॅट बरोबर विवाहबंधनात अडकला

अशी झाली प्रेमाची सुरवात

२०२४ मध्ये आमिर खानची चुलत बहीण नुझहत खान हिच्या माध्यमातून आमिर आणि गौरीची बेंगळुरू येथे पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला साधारण एक वर्ष ते 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप'मध्ये होते. त्यानंतर गौरी तिच्या मुलासह बेंगळुरूहून मुंबईला शिफ्ट झाली आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मार्च २०२५ मध्ये आमिर खानच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदा गौरीची मीडियाशी 'पार्टनर' म्हणून अधिकृत ओळख करून दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT