Aamir Khan old memories of qayamat se qayamat tak movie  pudhari photo
मनोरंजन

Aamir Khan | त्या काळात प्रमोशनसाठी साधने नव्हती..खुद्द आमिर-जुहीने रस्त्यावर उतरून वाटले होते 'कयामत से कयामत तक'चे पोस्टर्स

Aamir Khan qayamat se qayamat film | त्या काळात प्रमोशनसाठी साधने नव्हती..खुद्द आमिर-जुहीने रस्त्यावर उतरून वाटले होते 'कयामत से कयामत तक'चे पोस्टर्स

स्वालिया न. शिकलगार

'कयामत से कयामत तक' च्या प्रमोशनसाठी साधने कमी पडल्यामुळे आमिर खान आणि जुही चावला स्वतः रस्त्यावर उतरून पोस्टर्स वाटत होते. त्या काळातील मेहनत आणि त्यांचा संघर्ष चित्रपटाच्या यशामागचा महत्वाचा घटक ठरला. हा फोटोशूट आजही चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे.

आज, १४ मार्च रोजी आमिर खानने वयाची साठी पार केली आहे. एकेकाळी आपल्या ऊंची मुळे करिएरच्या चिंतेत असलेला आमिर बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट बनला. चित्रपट निर्माता ताहिर हुसैन और जीनत हुसैन यांचा मुलगा आमिर खानने 'यादों की बारात'(१९७३) मध्ये एक बाल कलाकार म्हणून अभिनय केला होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती मुख्य अभिनेता म्हणून त्याने 'कयामत से कयामत तक' (१९८८) मध्ये काम केले. आज देखील हा चित्रपट आणि गाणी सदाबहार आहे. पण या चित्रपटाचे प्रमोशन कसे करण्यात आले. त्याकाळी प्रमोशनसाठी साधने नव्हती. तरीही या चित्रपटाबद्द माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात आली, याचा अनोखा किसा आहे.

जेव्हा आमिर खान रिक्षा थांबवून वाटायचा पोस्टर्स

आमिर खान खुद्द रस्त्यावर उतरून चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रमोशन केले होते. रिक्षा थांबवून तो चालकांना पोस्टर्स वाटायचा आणि रिक्षाच्या मागे पोस्टर्स चिटकवायचा. त्याचा 'कयामत से कयामत तक' हा पहिली चित्रपट होता. मुख्य अभिनेत्री होती थांबवून जुही चावला.

‘कयामत से कयामत तक’ प्रमोशनची खास आठवण

१९८८ साली प्रदर्शित झालेला 'कयामत से कयामत तक' हा चित्रपट आजही बॉलीवुडमध्ये एक क्लासिक मानला जातो. त्या काळात प्रमोशनसाठी साधनसंपत्ती खूप कमी होती. म्हणून चित्रपटाचे मुख्य कलाकार आमिर खान आणि जुही चावला स्वतः रस्त्यावर उतरून पोस्टर्स वाटत होते. आमिर खान रिक्षा चालकांना थांबवत असे आणि त्यांना पोस्टर हातात देत असे. तर जुही चावला त्यांना विनंती करत असे की, ते पोस्टर आपल्या रिक्षाच्या मागे लावावेतय कुद्द जुहीने एका शोमध्ये सांगितले होते की, त्यावेळी सोशल मीडिय़ासारखे प्लॅटफार्म नव्हते. त्यामुळे गाडी आणि रिक्षा चालकांना जाऊन ती भेटून सांगत असे की, ती या चित्रपटात हिरोईन आहे. आणि हे पोस्टर्स रिक्षावर लावता येतील का? लोक तिच्याकडे पाहायचे आणि मग पोस्टर लावण्यास होकार द्यायचे.

या प्रमोशनच्या कार्यक्रमामुळे शहरभरात चित्रपटाची चर्चा सुरू झाली. आमिर आणि जुही यांनी थेट रस्त्यावर जाऊन पोस्टर्स वाटल्यामुळे प्रेक्षकांना आणि माध्यमांना चित्रपटाची माहिती मिळाली. त्या काळात सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म नसतानाही, कलाकारांनी आपल्या मेहनतीने चित्रपटाचे नाव मोठे केले.

उंचीमुळे करिअर घडते की नाही चिंता

एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना यांच्यासारखे उंच अभिनेते होते. आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो त्याच्या उंचीबद्दल खूप चिंतेत होता. त्याला करिअरबद्दल असुरक्षितता वाटायची. माझ्यासारखा कमी उंचीचा अभिनेता यशस्वी होईल की नाही याबद्दल मी खूप असुरक्षित होतो. पण, भाग्याने साथ दिली. सर्व काही ठीक होत गेले."

'कयामत से कयामत तक' चे हे पोस्टर प्रमोशन आजही चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठे यश मिळवले. आमिर खानच्या करिअरची सुरुवातही या चित्रपटाने अधिक उजळली. हा चित्रपट हिट ठरला त्यावेळी 'कयामत से कयामत तक'ची मोठी चर्चा झाली. तो एका शोमध्ये म्हटला होता -"हम सब सडको पे घुमते पोस्टर लगाने के लिए, दीवालों पे, टॅक्सी पे, ऑटो पे। कायी ऑटोवाले फ्री में पोस्टर्स लगाये.

या प्रकारामुळे चित्रपटाच्या यशामागचा त्याचा संघर्ष आणि कुठलीही लाज न बाळगता कलाकारांनी घेतलेली मेहनतीनेच त्यांचे नाव आज मोठं केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT