Aamir Khan-Gauri Spratt Wedding soon  pudhari photo
मनोरंजन

Aamir Khan-Gauri Spratt Wedding|मुंबईच्या भर पावसात लग्नाची जय्यत तयारी, 'लेडी लव्ह' गौरी स्प्रॅटसोबत अडकणार विवाह बंधनात

Aamir Khan Wedding |मुंबईच्या भर पावसात आमिर खानच्या लग्नाची जय्यत तयारी, 'लेडी लव्ह' गौरी स्प्रॅटसोबत अडकणार विवाह बंधनात

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. वयाच्या ६१व्या वर्षी तो त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत ५ जुलै रोजी रजिस्टर विवाह करणार आहे. या विवाहाची माहिती स्वतः आमिरने माध्यमांशी संवाद साधताना दिली होती., हा सोहळा खासगी स्वरूपात पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लग्नाच्या आदल्या दिवशी मुंबईतील पाली हिल परिसरातील आमिरच्या निवासस्थानी लगबग पाहायला मिळाली. घर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे. त्याच्या घरी खुर्च्या अन्‌ सोफा नेताना काहीजण दिसले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी ही तयारी सुरू असल्याचे दिसून आले. मीडिया रिपोर्टनुसार, आमिरच्या कुटुंबातील सदस्यही या तयारीत सहभागी होत आहेत. त्याची बहीणही घरी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत 'प्रीतम अँड पेड्रो' या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान आमिरने माध्यमांशी बोलताना आपल्या विवाहाची अधिकृत घोषणा केली होती. त्याने सांगितले होते की, ५ जुलै रोजी स्पेशल मॅरिज ॲक्ट' रजिस्ट्रेशनने विवाह केला जाईल. त्यानंतर जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी घरीच छोटेखानी जेवण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या विवाहासाठी १०० ते १५० निमंत्रितांना आमंत्रण असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कुटुंबीय, जवळचे मित्र तसेच चित्रपटसृष्टीतील काही निवडक व्यक्तींचा समावेश असेल. विवाह सोहळ्याला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राजकुमार संतोषी यांच्यासह आमिर खानचे काही मित्रही उपस्थित राहू शकतात.

आमिर खानच्या भावाने मागितली माफी

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता फैसल खान पुन्हा एकदा चर्चेत आला. त्याने काही काळापूर्वी भाऊ आमिर खान आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत त्यांच्याशी सर्व संबंध तोडल्याची घोषणा केली होती. आता फैसलने आपल्या त्या वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.

एका मुलाखतीत बोलताना फैसल खानने सार्वजनिकरित्या आई, बहीण, भाऊ आमिर खान आणि इतर कुटुंबीयांची माफी मागितली. भावनेच्या भरात आपण अनेक गोष्टी बोललो, ज्यामुळे कुटुंबाला त्रास झाला, याची जाणीव आता झाल्याचे त्याने सांगितले. फैसल म्हणाला की, सर्वप्रथम आपण आईची माफी मागू इच्छितो. त्यानंतर बहीण निखत, संतोष आणि आमिर खान यांच्याकडेही क्षमा मागत असल्याचे त्याने स्पष्ट केले. राग आणि दुःखामुळे आपण अशा प्रकारची वक्तव्ये केली, जी टाळायला हवी होती, असेही त्याने मान्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT