पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आला आहे. दोन अयशस्वी लग्नांनंतर, आमिरला पुन्हा एकदा प्रेम मिळाले आहे. पण पहिली पत्नी रीना दत्तापासून वेगळे झाल्यानंतर आमिर नैराश्यात गेला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासाठी हा काळ खूप कठीण काळ होता. या काळात आमिर दिड वर्ष दारून नशेत वावरत असून तो 'देवदास' बनल्याची माहिती समोर आली आहे.
आमिर आणि रीना दत्ता यांचे लग्न १८ एप्रिल १९८६ रोजी झाले. आमिरच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात रीना दत्ताने एक छोटी भूमिका साकारली होती. लग्नानंतर जुनैद आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. त्यांनी आमिर खानच्या ऑस्कर नामांकित 'लगान' चित्रपटात कार्यकारी निर्माता म्हणून काम केले होतं. डिसेंबर २००२ मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि ते विभक्त झाले. यानंतर आमिर नैराश्यात गेला.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने याबाबतची माहिती सांगितली आहे. "जेव्हा रीना आणि माझा घटस्फोट झाला तेव्हा मी सुमारे २-३ वर्षे नैराश्यात गेलो होतो. मी कोणतेही काम करत नव्हतो किंवा स्क्रिप्टही वाचत नव्हतो. त्या काळात मी घरी एकटाच असायचो आणि सुमारे दीड वर्ष खूप मद्यपान केले. याआधी मला कसलही व्यसन नव्हते. रिना वेगळे झाल्यानंतर मला काय करावे हे माहित नव्हते. मला रात्री झोप येत नव्हती आणि मी दारू पिऊ लागलो. काही दिवसानंतर मी एका दिवसात एक पूर्ण बाटली पिवू लागलो. त्यावेळी माझं आयुष्य 'देवदास'सारखा बनले होते.
यानंतर आमिरने 'जे पूर्वी माझे होते ते आता माझे राहिलेले नाही हे स्वीकारायला हवे असा समज करून त्यातून बाहेर पडल्याचेही म्हटले. फक्त आता आठवणी सिल्लक राहिल्या होत्या. स्वत:ची समजूत काढून मी हळूहळू स्वत: ला सावरत गेलो. आता दारू पिणे बंद केले आहे. असेही त्याने म्हटले आहे.
रीनाच्या घटस्फोटानंतर आमिरने २००५ मध्ये दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले होते. तेही फार काळ टिकलं नाही. दोघेजण २०२१ मध्ये वेगळे झाले. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. यानंतर आमिरने ६० व्या वाढदिवशी नवी मैत्रीण गौरी नात्याची पुष्टी केली. यानंतर आमिरच्या तिसऱ्या रिलेशनशीपची चर्चा रंगू लागली.