Afwaah 
मनोरंजन

Afwaah : अफवाहमधील ‘आज ये बसंत’ गाणं रिलीज, तुम्ही पाहिलं का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफवाहच्या ट्रेलरचे नुकतेच अनावरण करण्यात आले आणि त्याला प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळाली. सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अफवाहमध्ये भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुमीत व्यास आणि शरीब हाश्मी यांची पॉवरपॅक स्टारकास्ट आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, अफवाहच्या निर्मात्यांनी आता 'आज ये बसंत' चित्रपटातील गाणे रिलीज केले आहे. हे गाणे शमीर टंडनने संगीतबद्ध केले आहे. सुनेत्रा बॅनर्जी यांनी गायलेले हे गाणे डॉ. सागर यांनी लिहिले आहे.

हे गाणे ट्रेलरमधून खास गोष्टी दाखवत आहे. हे गाणं 'अफवाह'च्या आफ्टर इफेक्टबद्दल बोलते, ज्यामुळे संपूर्ण शहर भूमी पेडणेकर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा पाठलाग करते. अफवा लोकांना जीवघेण्या परिस्थितीत कसे आणू शकतात, हाहाकार माजवू शकतात आणि वणव्यासारख्या अफवा कशा पसरू लागतात आणि तुमचा पाठलाग करणे थांबवत नाही अशा अक्राळविक्राळ गोष्टी कशा प्रकारे पसरतात हे दाखवते.

सुधीर मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणेकर, शारीब हाश्मी, सुमित कौल, सुमीत व्यास, रॉकी रैना आणि टीजे भानू यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या बनारस मीडिया वर्क्स या बॅनरखाली तयार केला आहे. ५ मे २०२३ रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT