मुंबई : पुढारी ऑनलाईन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' ही मालिका चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि सीमा घोगळे यांची दमदार भूमिका असून त्या दोघेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. त्या नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अपूर्वा आणि सीमाने सध्या रॉयल फोटोशूट करून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अपूर्वा गोरे आणि सीमा घोगळे यांनी आपआपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघीही ट्रेडिशनल आऊटफिट्स क्लासी लूकमध्ये दिसत आहेत. यात अपूर्वा आणि सीमाने लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर हेव्ही ज्वेलरी परिधान केली आहे. या वेशात दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोसोबत अपूर्वा आणि सीमाने 'पधारो मारे देस रे..' असे कॅप्शन लिहिले आहे.
हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत अपूर्वाने ईशा देशमुख आणि सीमाने विमलची भूमिका साकारली आहे. अपूर्वा आणि सीमा अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्य देखील करतात. याआधी त्यांनी सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
(photo : apurvagore and seemaghogale instagram वरून साभार)