rupali bhosle  
मनोरंजन

आई कुठे काय करते : संजना हिच्या दिलखेचक अदांनी रंगणार नववर्ष

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. संजना अर्थातचं रुपाली भोसले हिच्या दिलखेचक अदांनी नव वर्ष रंगणार आहे. संजना नव्या वर्षाच्या पार्टीसाठी सज्ज झालीय.

स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या खास कार्यक्रमात आई कुठे काय करते मालिकेतील sanjana म्हणजेच रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे.

sanjana ने ठसकेबाज लावणी सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळतो. या कार्यक्रमातील तिचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

पाहा स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ रविवार २ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT