मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte : अभिनेत्री राधा सागरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आई कुठे काय करते' ( Aai Kuthe Kay Karte ) फेम अभिनेत्री राधा सागरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राधाने नुकतेच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. याबाबतची माहिती राधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. याआधी राधाने तिच्या प्रेग्नन्सीमधील बेबीबंपचे फोटोशूट केले होते.

अभिनेत्री राधा सागरने सोशल मीडियावर नुकतेच तिच्या हातात एका गोंडस बाळाचा हात असलेला फोटो शेअर केला आहे. यात राधाच्या हाताखाली तिच्या पतीचादेखील हात दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '…आणि शेवटी आयुष्यातील सर्वोत्तम क्षण…आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले, आयुष्याच्या या नव्या मालिकेत आई आणि वडील म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद.' असे लिहिले आहे. यावरून रादाने एका मुलाला जन्म दिल्याची माहिती मिळत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी राधासोबत तिच्या पतीवरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी दोघांवर कॉमेन्ट करताना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंवर ७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स आणि कॉमेन्टस केल्या आहेत. राधा 'आई कुठे काय करते' यासह 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT