पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘आदिशक्ती’ ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले आहे. या मालिकेचं नवीन पर्व सुरु झाले आहे. (Aadishakti New TV Serial )
'आदिशक्ती' मालिकेतील ८ वर्षाची शक्ती आता मोठी होणार आहे. मालिकेच्या कथानकाचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. मोठ्या शक्तीची भूमिका अभिनेत्री राजसी चिटणीस साकारणार आहे तर शक्तीची साथ शिवा हे पात्र देणार आहे जे अभिनेता अतुल आगलावे साकारणार आहे. शक्ती कुठे व कोणासोबत राहते? शक्तीच्या नव्या विश्वात तिच्यासह कोण-कोण असणार? शक्तीच्या कठीण प्रसंगात शिवा साथ देणार का? शिवा- शक्तीचं नातं कस उलगडणार? शक्तीला पडलेल्या प्रश्नांची उत्तर ती शोधू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं या नवीन पर्वात उलगडणार आहेत. (Aadishakti New TV Serial )
शिवशक्तीचा हा नवा प्रवास पाहा ‘आदिशक्ती’ २१ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता.